अक्कलकोट – प्रसिद्ध वकील वैजनाथ एस. झळकी यांनी त्यांच्या ४५ व्या वाढदिवसा निमित्त शाळेच्या मुलीसाठी स्वखर्चाने शौचालय बांधकाम सुरू करून विविध समाज उपयोगी काम करून साधे पणाने वाढदिवस साजरा केले.
शेतकऱ्यांसह ग्राहकांच्या हितासाठी लढणाऱ्या आणि जय भारत माता सेवा समितीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या असलेल्या वकील झलकी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या समारंभात वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून आणि हायस्कूलच्या विद्यार्थिनीची शौचालय स्वखर्चाने बांधून एक आदर्श निर्माण केल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.शौचालय बांधण्यासाठी शाळेत त्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.अँड वैजनाथ झलकी यांच्या वाढदिवस समितीचे जिल्हाध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली फळे, ब्लँकेट आणि चादरी वाटण्यात आल्या. नंतर रुग्णालयाच्या आवाराबाहेर अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या चरित्रांवर आधारित पुस्तके वाटून देशभक्ती विकसित करण्याचे आवाहन केले. तसेच कलबुर्गी शहरातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फळे आणि मिठाई वाटप केली.
याप्रसंगी अखिल भारतीय उर्दू मंचचे प्रमुख सय्यद आर खस्ती उपस्थित होते. शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य निंगाना केरुरा, शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



















