Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्हा बाबात दुजाभाव, तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आरोप

तरुण भारतbyतरुण भारत
November 26, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा,
पंढरपूर – आम्हाला नगराध्यक्षपदासाठी एक चिन्ह आणि इतर आमच्या नगरसेवकपदासाठीच्या उमेदवारांना दुसरे चिन्ह देण्याचा घाट येथील निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांकडून घातला जात असल्याचा आरोप तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार डाँ.प्रणिता भालके यांनी केला आहे.

भालकें यांनी नुसता आरोप केला नाही तर नगरपालिका कार्यालयातील निवडणूक कक्षात जावुन संबंधित आधिकाऱ्यांना याबाबत जाब देखील विचारला. दरम्यान निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच आमच्या कडून कामकाज केले जात आहे. त्या मध्ये कोणाताही दुजाभाव केला जात नसल्याचे येथील निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले. 


या आरोप, प्रत्यारोपा संदर्भातील सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचलेली दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या मध्येच येथील तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाँ.प्रणिता भालके यांनी निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांकडून चिन्हा बाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करीत येथील नगरपालिका इमारती मधील निवडणूक कार्यालयात मंगळवारी (ता.२५) धाव घेत संबंधितांना जाब विचारला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आदींसह तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांकडून तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराला आणि अन्य नगरसेवक पदाच्या उमेदवाराला एकच चिन्ह दिलेल जाणार की वेगवेगळी चिन्हे वाटप होणार हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे. जर वेगवेगळी चिन्हे दिली तर तिर्थक्षेत्र विकास आघाडी आंदोलनाची भूमिका घेणार याकडे पंढरपूरवासियांचे लक्ष लागलेले आहे.
———————-

अधिकाऱ्यांकडून चिन्हा बाबत दुजाभाव होत असल्याचा डाँ.भालके यांनी केला आरोप
येथील निवडणूक निर्णय अधिकारी पहिल्या दिवसांपासून दुजाभाव करीत असल्याचा आरोप डाँ.भालके यांनी केला आहे. निवडणूकीच्या कार्यक्रमा नुसार सर्वांनाच चिन्हाचे वाटप बुधवारी (ता.२६) केले जाणार आहे. मात्र येथील पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीकडून चिन्हा वाटपा अगोदरच त्यांचे कपबशी हे चिन्ह प्रचार दरम्यान कसे काय मिरवले जात आहे. नागरिकांना कपबशी चिन्हा समोरील बटण दाबण्याचे आवाहन त्यांच्या उमेदवारांकडून कसे केले जात असल्याचा जाब विचारला. येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्यासमवेत निवडणूक लढविणाऱ्या त्यांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीला एक न्याय दिला जातो आहे.

या उलट आपल्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीला दुसरा न्याय दिला जात असल्याचा आरोप केला. कारण आमची देखील तिर्थक्षेत्र विकास आघाडी ही रजिस्टर्ड आहे. त्यामुळे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाची निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळाले पाहिजे. मात्र निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांकडून नगराध्यक्षपदासाठी एक आणि आमच्या सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना दुसरे चिन्ह देण्याचा घाट घातला जात आहे. या संदर्भात भालके यांच्याकडून आधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. चिन्ह वाटपा अगोदरच सध्या प्रचारा दरम्यान विरोधकांकडून कसा काय चिन्हाचा वापर होत असल्याचे व्हिडिओ देखील दाखविण्याची तयारी यावेळी त्यांनी दर्शविली. 
————————

डाँ. भालकेंच्या आरोपांवर अधिकारी सीमा होळकर यांचे स्पष्टीकरण –

आयोगाने निवडणूकीचा जाहीर केलेला जो कार्यक्रम आहे त्या प्रमाणे चिन्ह वाटप उद्या आहे. चिन्ह वाटपा संदर्भात तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकांचे काही म्हणणे होते ते मांडण्यासाठी ते इथे आलेले होते. त्यांचे म्हणणे असे होते की आम्हाला सगळ्यांना एक म्हणजे नगराध्यक्षपासून ते सदस्या पर्यंत सगळ्यांना आम्हाला एकच चिन्ह मिळावे अशी त्यांची मागणी होती. ती मागणी मांडण्यासाठी ते सर्वजण इथे आलेले होते. त्या संदर्भात नियम, अटी काय आहेत ते त्यांना सांगण्यात आले आहे. याच्या व्यतरिक्त चिन्हा बाबतचा जो काही निर्णय आहे तो उद्या होणार आहे. दरम्यान राष्ट्रीय पक्षाला चिन्ह दिलेले असते त्यामुळे त्यांचा चिन्हाबाबत काही विषय येत नाही. राज्यपक्षांना चिन्हे दिलेली असतात त्यामुळे त्यांचा देखील विषय येत नाही. मात्र नोंदणीकृत अमान्याताप्राप्त ज्या आघाड्या आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांच्या संदर्भात काही नियम आहेत. त्या नियमा प्रमाणे संबंधित आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या अगोदर तीन दिवस त्यांना जर काही एखादे चिन्ह हवे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात त्या संदर्भात अर्ज करणे आवश्यक असते. तो अर्ज केल्या नंतर तेथून त्यांच्यासाठी चिन्ह गोठविले जाते किंवा दिले जाते. या प्रमाणे तिर्थक्षेत्र विकास आघाडीने अर्ज केला होता. पण तो वेळेत न केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना चिन्ह गोठवुन दिले नाही. त्यांचा विषय असा होता की ते चिन्ह त्यांना इथे मिळावे ही मागणी करीत ते इथे आलेले होते.
———————


अखरे एकच चिन्हाचा रात्री उशिरा निर्णय –
दरम्यान दिवसभराच्या धुमचक्री नंतर येथील निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांनी रात्री उशिरा तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसवेकपदाच्या सर्व उमेदवारांना एकच रिक्षा देण्यात येईल असे जाहीर केल्याची माहिती तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
—————————–


आमच्या नगराध्यक्षपदासाठी आणि सर्व नगरसेवक उमेदवारांसाठी एकच चिन्ह जर मिळाले नाही तर उद्या पासून आम्ही मतदानाच्या तारखे पर्यंत अर्थात २ डिसेंबर पर्यंत नगरपालिका कार्यलाया मध्ये धरणे आंदोलन किंवा ठिय्या आंदोलन करणार आहोत. आम्ही कोणताही प्रचार करणार नाही आहोत. चिन्हा बाबतचा हा दुजाभाव आम्ही कदापिही सहन करणार नाही.

Post Views: 58
Previous Post

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वतीने प्रभु श्रीराम मंदिरचा शिखरावर ध्वजारोहण

Next Post

वाढदिवसा निमित्त स्वखर्चाने शाळेच्या मुलीसाठी शौचालय बांधकाम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाढदिवसा निमित्त स्वखर्चाने शाळेच्या मुलीसाठी शौचालय बांधकाम

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001451

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!