सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर संविधान दिवसानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभुमी येथे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, जावेद पानगल, बी.के.तळभंडारे,सुशील सरवदे,के.डी.कांबळे,श्रीनिवास सरवदे,अतुल नागटिळक,विकास सरवदे,महादेव बाबरे,शिवम सोनकांबळे,संजय बाबरे,अजित सरवदे,बापू सदाफुले, लिंगरे , कांबळे,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.



















