पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सर्वात जुने प्राथमिक आरोग्य केंद्र आहे .याठिकाणी ह्या इमारतीचे बांधकाम यापुर्वी 1978 ह्या वर्षी जवळपास 48 वर्षाची इमारत सध्या शेवटची घटका मोजत असुन याठिकाणी मुख्य इमारतीची प्रचंड दुरावस्था झाली आहे एवढी ही इमारत धोकादायक झाली आहे .सध्या याठिकाणी असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विश्रामगृहाशेजारी असणाऱ्या सांस्कृतिक भवनाशेजारी सुरू आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या निधीची गरज होती याची वारंवार मागणी पिलीवचे माजी लोकनियुक्त सरपंच तथा भाजपचे माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष नितीन मोहीते ,पिलीव गटाचे माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मःञी तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे ,माळशिरस तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी निधीची मागणी करीत वारंवार पाठपुरावा केला अखेर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीसाठी जिल्ह्य वार्षिक योजना ( जिल्ह्य नियोजन समीती ) यामधून बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन यामधील पहीला हप्ता चार कोटी पंच्याहत्तर रुपये 31 आकटोंबर रोजी देण्यात आला आहे .
सदरचे बांधकाम हे योग्य रित्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्व सोईसुविधायुक्त, वेळेत पुर्ण करण्याचे यामध्ये नमुद करण्यात आले आहे .याठिकाणी हे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत याबरोबरच कर्मचारीवर्ग यांना राहण्यासाठी अद्यावत अश्या क्वार्टर सुद्धा करणे आवश्यक आहे
हे प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस तालुक्यातील सर्वात जुने प्राथमिक आरोग्य केंद्र आहे .याचे पाठीमागेच ग्रामीण रुग्णालयात रुपांतर होणे आवश्यक होते माञ केवळ राजकीय अनास्थेमुळे हे झाले नाही .सोलापूर _ सातारा महामार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या पिलीव गावातील हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.माळशिरस, अकलूज, नातेपुते याठिकाणी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षा हे जुने प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.त्या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर झाले आहे .पण याचे नाही .
पिलीव व आसपासच्या पंचवीस ते तिस हजार लोकांना याठिकाणाहुन आरोग्य सेवा मिळते .भविष्यात नवीन इमारत झाल्यानंतर तरी याचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे अशी या भागातील नागरिकांची इच्छा आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रास पालकमंञी जयकुमार गोरे व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल मदने ,शिवराज पुकळे, प्रमोद भैस, संजय पाटील, अतुल नष्टे ,गणेश देशमुख, मेजर गलांडे,बालम जमादार, अंकुश भैस, वस्ताद सोलंकर, तुषार लवटे ,रामभाऊ गोरड,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. फोटो _ (1) जयकुमार गोरे (2) रामभाऊ सातपुते (3) नितीन मोहीते.

























