सोलापूर – अमरावती येथे दि.18 ते 20 डिसेंबर या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्चरी – रिकव्हर या क्रीडा प्रकारात श्रीमती निर्मलाताई कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता 11वी मधील विद्यार्थिनी कुमारी प्रगती शिंदे हिने 17 वर्षे वयोगटात पुणे विभागाकडून खेळताना या स्पर्धेत एकूण चार पदके मिळवली. त्यात 1 सुवर्णपदक, 1 रौप्य पदक, 2 कांस्यपदक यांचा समावेश आहे.
तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची रांची -झारखंड येथे दि. 6 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आर्चरी – रिकव्हर महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे. सद्या ती तज्ञ मार्गदर्शक श्री. रंजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे सराव करीत आहे. प्रशालेतील क्रीडा मार्गदर्शक श्री सुरवसे ए. पी. यांचेही तिला मार्गदर्शन लाभले आहे.
तिच्या या क्रीडा स्पर्धेतील देदीप्यमान कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विपिन ठोकळ, उपाध्यक्ष श्री सचिन ठोकळ, सचिव श्री भिकाजी गाजरे, संचालिका शिल्पाताई ठोकळ, प्राचार्य श्री डी गाजरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


















