बिलोली / नांदेड – येथील नगरपालीकेत नुकतेच विराजमान झालेले बिलोली नगरीचे नगर प्रमुख संतोष कुलकर्णी यांनी मतदारांनी मतदानातुन दिलेला कौल पाहता अगदी विजयांनी भारावून गेले आहेत.अशात काडीचाही विलंब न करता आपल्या विकास कामांना सुरवात केली असून त्यांनी दि.२३ रोजी बिलोली शहरात नगरोत्थान योजने अंतर्गत नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करणे बाबत मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून रीतसर प्रस्ताव सादर केला असून या दरम्यान सकारात्मक चर्चाही झाली आहे.
शहरात सध्या जुनी पाणी पुरवठा योजना आहे. सदर योजनेस ५० वर्षाहून अधिक काळ झाला आहे.जुनी पाणी पुरवठा पाईप लाईन खराब झाली असून त्यामुळे स्थानिक लोकांना पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे व पाण्याची कमतरता जाणवत आहे.शहराला सुरळीत पाणी पुरवठा मिळण्यासाठी नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करणे अत्यंत गरजेचे आहे.
सद्यास्थितीमध्ये हा प्रस्ताव.प्रशासकीय मान्यते करिता नगर विकास विभागाकडे प्रलंबीत आहे. नगराध्यक्ष कुलकर्णी या कामास प्राधान्याने शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत नविन पाणी पुरवठा योजनासाठी प्रशासकीय मंजूरी देण्यात यावी व निधी उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरुन स्थानिक लोकांचा पाणी प्रश्न सुटेल अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.यासह बिलोली शहराचा नव्याने वस्तीवाढ झाल्याने त्याठिकाणी आवश्यक रस्ते,नाली झालेली नाही,त्यामुळे जनतेच्या मुलभुत सुविधा देण्यापासुन न.प.वंचित आहे. सदरच्या सुविधा देण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात यावेत यासह अतिक्रमण नागरीकांना हक्काचे घर मिळवुन देण्यासंबधीची मागणी मुख्यमंञ्यांकडे केली आहे.
विरोधकांकडुन नको त्या गोष्टीचा सोशलमिडीयावर बोंबाटा केला जात असला तरी गोर-गरीब माय-बाप जनतेंनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,निवडणुकपुर्वी दिलेल्या प्रत्येक वचन पुर्ण करणार त्यासाठी सर्वच सत्ताधा-यांची मदत घेणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष संतोष कुलकर्णीं यांनी दिली.
























