भारतातील पहिली गृह वित्तीय कंपनी HDFC तिच्या उपकंपनी HDFC बँकेत विलीन होणार आहे, जे कार्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार ठरेल. जेव्हा आपण जगातील सर्वात मोठ्या बँकांचा विचार करतो तेव्हा अमेरिका, चीन आणि युरोप मधील बँकांची नावे समोर येतात. पण आता भारतही त्यात सामील झाला असून आता एक भारतीय बँक जगातील सर्वात शक्तिशाली बँकांमध्ये सामील होणार आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर स्थापन झालेली ही बँक असेल. एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण आज १ जुलैपासून लागू होणार असून यानंतर ही भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक होईल. यामुळे चीन आणि अमेरिकेच्या आघाडीच्या बँकांना नवे आव्हान मिळणार आहे.
HDFC मर्जरनंतर काय बदलले
देशातील कॉर्पोरट क्षेत्रातील सर्वात मोठ्या करारानंतर एचडीएफसी आता जेपी मॉर्गन, आयसीबीसी आणि बँक ऑफ अमेरिका नंतर बाजार मूल्यानुसार जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे. देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण असून त्याचा आकार ४० अब्ज डॉलर्स आहे. विलीनीकरणानंतर अस्तित्वात आलेली नवीन कंपनी देशातील सर्वात मोठी वित्तीय सेवा फर्म बनली असून आता त्याची एकूण मालमत्ता १८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.
HDFC शेअरमध्ये काय बदलले
बीएसईच्या निर्देशांकात नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे वेटेज रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा जास्त असेल. सध्या रिलायन्सचे वेटेज १०.४$ आहे, परंतु मर्जरनंतर एचडीएफसी बँकेचे वेटेज १४% जवळपास असेल. या डील अंतर्गत HDFC च्या प्रत्येक शेअरहोल्डरला २५ शेअर्सच्या मागे HDFC बँकेचे ४२ शेअर्स मिळतील. त्याच वेळी, एचडीएफसी शेअर्सचे डीलीस्टिंग १३ जुलैपासून प्रभावी होईल.४ एप्रिल २०२२ रोजी HDFC बँकेने देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC स्वतःमध्ये विलीनकरणास हिरवा सिग्नल दिला होता.
जगातील चौथी सर्वात मोठी बँक
HDFC बँक आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणामुळे तयार झालेली बँक बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील चौथी सर्वात मोठी बँक आहे. जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी,इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना लिमिटेड आणि बँक ऑफ अमेरिका कॉर्प या HDFC पेक्षा जगातील सर्वात मोठ्या बँका आहेत. ब्लूमबर्ग डेटानुसार या नवीन HDFC बँकेचे मूल्यांकन $१७२ अब्ज असेल. तर जगातील सर्वात मोठ्या बँक जेपी मॉर्गनचे मूल्य $४१६.५ अब्ज, त्यानंतर ICBC $२२८.३ अब्ज आणि बँक ऑफ अमेरिका $२२७.७ अब्ज आहे.
HDFC अध्यक्षांचा राजनामा
महा-विलीनीकरणाच्या कधी तासांपूर्वी एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेअरहोल्डर्सना शेवटच्या संदेशात त्यांनी म्हटले की – भविष्यात काय होईल, फक्त वेळच सांगेल. परंतु आज संस्थांना सर्वात मोठी जोखीम आहे ती स्थिती कायम ठेवायची आहे. यासोबतच भूतकाळात केलेले चांगले काम भविष्यातही कायम राहील, असा विश्वासही कायम ठेवावा लागेल.