हिमाचलप्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा परिसरात आज, शुक्रवारी बोलेरो जीप नदीत कोसळून 6 पोलिस जवानांचा मृत्यू झालाय. तर चार जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
चंबाचे पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार चंबा जिल्ह्यातील तीसा भागात शुक्रवारी सकाळी पोलिसांना घेऊन जाणारी बोलेरो जीप सियोल नदीत कोसळली. या अपघातात 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जीप चालक आणि 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 4 पोलिस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच एक पोलिस कर्मचारी नदीमध्ये वाहून गेला असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिस आणि एनडीआरएफचे पथक वाहून गेलेल्या जवानाचा शोध घेत आहेत.हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ल आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी जखमी जवानांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.