एखादा सल्ला कसा फायद्याचा ठरु शकतो यांचे ज्वलंत उदाहरण वाघोली येथील निलेश काकडे यांचे देता येईल. या सल्ल्यामुळे आज निलेश काकडे यांचा टर्न ओव्हर दिड कोटी पर्यंत झाला आहे. तालुक्यातील वागोली येथील तरुण शेतकऱ्याने मित्राच्या सल्ल्याने २०१६ साली कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. आधी डीपी क्रॅश जातीची १४० पिल्लांपासून सुरू केलेला हा व्यवसाय सध्या दीड हजार कोंबड्यावर येऊन ठेपला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय करण्याचा मानस निलेश काकडे यांनी केला होता. हा त्यांचा मानस पूर्ण करण्यासाठी त्यांचे पांगरी येथील मित्रा महेमुद शेख यांच्या सल्ल्याने या व्यवसायामध्ये उतरून आज ६० दिवसात लाखोंचा नफा कमवत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश काकडे यांचा या व्यवसायातून दिड कोटीचा टर्नओव्हर झाला आहे. निलेश काकडे यांची वडिलोपार्जित साडेआठ एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये त्यांनी उसाचे उत्पादन घेतले होते. त्या ऊसाला त्यांनी कोंबड्याचे खत वापरले आणि उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे त्यांना दिसून आले. कोंबड्याचे खते उसासाठी पोषक असल्याचे त्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी आणखीन कोंबड्या वाढवल्या. आपल्या शेतामध्ये शेड उभा करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला. नगर आणि पुणे येथून त्यांनी एक दिवसांची गावरान कोंबड्यांची २० रुपयांना एक करून १५०० पिल्ले विकत आणली. या पिल्लांचं संगोपन खाद्य आणि औषधी उपचार यांच्याकडे वेळोवेळी लक्षपूर्वक काळजी घेऊन ६० दिवसाची पिल्ले होताच ते विक्रीसाठी तयार होतात.
ही पिल्ले तयार झाल्यानंतर हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर विक्रीसाठी पाठवले जातात. याला सध्या जागेवर १८० रुपये रोख स्वरूपात दर मिळतो. हा व्यवहार करत असताना ते व्यापाऱ्यांना वेळोवेळी मोबाईलद्वारे कोंबड्यांची माहिती पुरवतात. त्याद्वारे दर ठरवून व्यापारी स्वतः जागेवर येऊन विकत घेऊन जातात. यामुळे काकडे यांना साठ दिवसात ८० ते १ लाख रुपयांच्या जवळपास खर्च वजा जाता यातून मिळतात. शेतीसोबत जोडधंदा म्हणून या व्यवसायाने त्यांना भरभराटी मिळवून दिलेली आहे. सोबतच या कोंबड्यांच्या खताचे देखील शेतामध्ये वापर करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. काकडे यांना यामुळे दुसरीकडे कुठेही काम धंदा शोधण्याची गरज नसून या व्यवसायातून त्यांना आर्थिक भरभराटी मिळालेली आहे.