पिलीव – आमदार उत्तमराव जानकर यांच्या स्थानिक विकास निधीमधून मंजूर झालेल्या दहा लाख रुपये निधीचा बचेरी डबच्या वाडा येथील बिरोबा मंदिराससमोरील मंजूर सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार उत्तमराव जानकर यांनी निर्धार व्यक्त करताना
बचेरी शिंगोर्णी सुळेवाडी या दुष्काळी पट्ट्यातील गावांना निरा देवधर प्रकल्पाचे पाणी मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही .त्या भागातील बहुतांश मेंढपाळ या भागातील शेतीला पाणी नसल्यामुळे सहा महिने गाव सोडून मेंढरे चारण्यासाठी काळ्यारानाला जातात म्हणून या गावाचा कायमस्वरूपी दुष्काळ हटविण्यासाठी जिवात जीवमान असेपर्यंत संघर्ष करीत राहणार असल्याचे सांगताना शिंगोर्णी पासून शिंगणापूर पर्यंत पायी चालत निरादेवधर प्रकल्पाच्या पाण्यासाठी पदयात्रा काढल्याचेआमदार उत्तमराव जानकर यांनी सांगितले .
यावेळी
कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, शामतात्या मदने महावीर धायगुडे , सरपंच विश्वजीत गोरड, मोहन शिकारे ऑडिटर शिवाजीराव सावळजकर, सोमनाथ गाढवे नारायण शिंदे सुदाम शिंदे अशोक पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गोरख शिंदे , भारत शिकारे शंकर शिकारे, धनाजी शिकारे, माऊली काटे, शिवाजी शिंदे, नारायण खरात, बापू गाढवे, भीमराव गाढवे ,शिवबाबा शिंदे, महादेव लकडे, समाधान लकडे, महादेव गाढवे, आप्पा गाढवे, विकास लकडे, नाना धुलगुडे, मारुती राजगे, पोपट लकडे, राहुल लकडे, दशरथ ढवळे , मारुती पडळकर, नाना मंडले, ज्ञानू बोडरे, बिरदेव ढवळे, अमोल लकडे, सचिन मदने, बिरुदेव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सरपंच विश्वजीत गोरड यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले
आमदार उत्तमराव जानकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या बिरोबा देवस्थानच्या सभा मंडपाचे भूमिपूजन करताना आमदार उत्तमराव जानकर संग्राम सिंग जागीदार श्याम तात्या मदने महावीर धायगुडे विश्वजीत गोरड


















