Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतातील ऊस नेल्याच्या जाब विचारल्याने महिलेला कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in crime
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी –

चांदज (ता. माढा) येथे शेतातील ऊस तोडून ट्रॅक्टरमधून कारखान्याकडे नेत असताना जाब विचारणाऱ्या महिलेला कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिता नितीन पाटील (वय ३५, व्यवसाय घरकाम/शेती, रा. चांदज, ता. माढा, जि. सोलापूर) या दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतजमिनीतील ऊस ऊसतोड टोळीमार्फत तोडून ट्रॅक्टरमध्ये भरून कारखान्याकडे नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यावेळी गावातील बळीराम हनुमंत हेगडकर व पंढरी हनुमंत हेगडकर हे ऊस घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने फिर्यादी यांनी त्यांना “माझ्या शेतातील ऊस तोडून का नेताय?” असा जाब विचारला. यावर “तुझ्या बापाचा ऊस आहे का?” अशी उद्दाम भाषा वापरल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर बळीराम हेगडकर याने हातातील ऊसतोडीच्या कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पोटरीवर वार करून जखमी केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पंढरी हेगडकर याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या नडगीवर तसेच दोन्ही पायांवर, कमरेवर व पोटावर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, या वादात इतर आरोपीही सहभागी झाल्याचा आरोप आहे. शिवाजी हनुमंत हेगडकर, शंकर शिवाजी हेगडकर, नामदेव पंढरी हेगडकर, बाबुराव वसंत हेगडकर, सिता बळीराम हेगडकर व कल्पना शंकर हेगडकर (सर्व रा. चांदज, ता. माढा) यांनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून जमिनीवर हातपाय धरून आपटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यावेळी फिर्यादीची मुलगी प्रांजली व फिर्यादीच्या भावाची मुलगी समीक्षा शेंडगे या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच शंकर हेगडकर व बळीराम हेगडकर यांनी त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळून फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय शंकर हेगडकर याने फिर्यादीची मुलगी प्रांजली हिच्या छातीवर बुक्क्याने मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८६/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 324(4)(5), 189(2), 191(2), 191(3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय. गणेश चौधरी, पोलीस हवालदार गोळे व पोलीस कॉन्स्टेबल तळेकर करीत आहेत.

————————————–

आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

दरम्यान, टेंभुर्णी परिसरातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने झाकले येथील ह भ प महाराज गायकवाड यांचे पोस्टमार्टम करण्यास नकार दिल्याने संबंधित मृतदेह सोलापूर येथे नेऊन पोस्टमार्टम करावे लागले होते.

त्यानंतर आता चांदज येथील मारहाणीच्या घटनेत जखमी महिलेला गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री टेंभुर्णी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत थांबावे लागले. त्यानंतर तिला प्राथमिक उपचारासाठी टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तात्पुरता उपचार करून तेथून पुढे कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. कुर्डूवाडी येथून पुढे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी जाण्यास चिठ्ठी दिली 

मात्र टेंभुर्णी ते सोलापूर हे अंतर जवळपास १०० किलोमीटर असल्याने जखमी महिलेला वेळेत व योग्य उपचार मिळणे शक्य झाले नाही. परिणामी ती महिला उपचार न घेता अखेर घरी निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जखमी रुग्णाला २४ तास उपचारासाठी विविध ठिकाणी फिरावे लागणे आणि शेवटी उपचार न मिळाल्याने परत जाणे, हा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

परिसरातील नागरिकांना तातडीने योग्य उपचार, औषधे व सेवा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Post Views: 7
Previous Post

सोलापूर विद्यापीठाचा 492 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

Next Post

वाडी – सोलापूर दरम्यान सुरू असलेल्या विकासकामांचा महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाडी – सोलापूर दरम्यान सुरू असलेल्या विकासकामांचा महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

February 19, 2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

February 19, 2026

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

February 19, 2026

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

February 19, 2026

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

February 19, 2026

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजारांचा दंड

February 19, 2026

शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम

February 19, 2026

प्रभाग २२ मध्ये १४ लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन; आश्वासनांपासून कृतीकडे विकासाची वाटचाल

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686900

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697