Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर विद्यापीठाचा 492 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 492 कोटी 35 लाख 62 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने दुरुस्तीसह एकमताने मंजुरी दिली. 430 कोटी 74 लाख 98 हजार रुपये इतकी अपेक्षित जमा गृहीत धरून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात 61 कोटी 60 लाख 64 हजार रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास, संशोधन आणि नवोपक्रमांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

बुधवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी सदस्य सचिव म्हणून काम पाहिले. वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे यांनी हे अंदाजपत्रक सादर केले.

अंदाजपत्रकाची मांडणी देखभाल-दुरुस्ती, वेतन, ऋण व अनामत, विकास योजना भाग-१ (शासन अनुदान) आणि विकास योजना भाग-२ (विद्यापीठ निधी) अशा पाच टप्प्यांत करण्यात आली. सादरीकरणानंतर सदस्यांनी सविस्तर चर्चा करून काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यानंतर अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी देण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी मागील इतिवृत्तांत कायम करण्यात आला. प्रश्नोत्तराचा तास पार पडल्यानंतर विविध ठरावांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. विद्यार्थी विकास व संशोधनाभिमुख नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी असल्याचे चित्र अधिसभेतील चर्चेतून स्पष्ट झाले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. प्रशांत पवार, डॉ. समाधान पवार, डॉ. प्रभाकर कोळेकर,  सिनेट सदस्य डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. भगवान आदटराव, प्राचार्य डॉ. शंकर नवले, रोहिणी तडवळकर, यतिराज होनमाने, गणेश डोंगरे, अजितकुमार संगवे, चन्नवीर बंकुर, डॉ. जैनोद्दीन मुल्ला, ॲड. उषा पवार, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, ॲड. नीता मंकणी, ॲड. सुनंदा भगत,  माधव देशपांडे, डॉ. सीमा गायकवाड, सिद्धेश्वर स्वामी, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. मंगेश वेदपाठक, सुदर्शन यादव, अनिल घनवट, सौ. गवळी आदीनी प्रश्नोत्तरे व प्रस्तावाच्या चर्चेत भाग घेतला.

——–

*ठळक तरतुदी*

* डाटा सेंटरसाठी 6 कोटी

* अहिल्यादेवी स्मारक लेझर शो साठी 2 कोटी

*शिक्षकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी ‘सीड मनी’ उपक्रमासाठी 35 लाख रुपये.

*मुलींच्या उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी ‘मुली शिकवा, समाज घडवा’ उपक्रमासाठी 5 लाख रुपये.

*‘कमवा व शिका’ योजनेसाठी 20 लाख रुपये.

*आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग 1.25 कोटी

 * खेळाडूंसाठी वैद्यकीय खर्च परतावा 2 लाख

*शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेसाठी 20 लाख रुपये.

*विद्यार्थी संशोधन शिष्यवृत्ती आणि 40 गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यासाठी भरीव तरतूद.

*इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेससाठी विद्यापीठ हिस्सा म्हणून 50 लाख रुपये.

*स्पर्धा परीक्षा अभ्यास कक्ष, विद्यार्थी क्षमता संवर्धन कार्यक्रम, नवीन लेखक-प्रकाशक प्रोत्साहन योजना आणि ‘माझे विद्यापीठ’ उपक्रमासाठी विशेष निधी.

——–

प्रोफे जे. बी. जोशी यांना डीएससी व गिरीश प्रभुणे यांना डिलीट पदवी देणार

पद्मभूषण प्रोफेसर जे. बी. जोशी यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एससी) व पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर( डि.लीट.) ही मानद पदवी देण्याचाही ठराव आधिसभेने सर्वांनुमते मंजूर केला. नवीन शासन निर्णयानुसार ही नावे शिफारस करण्याचा अधिकार कुलगुरूंना  असल्यामुळे त्यांनी ही दोन नावे राज्यपाल तथा कुलपती यांच्या मंजुरीसाठी पाठवली होती.  त्यांनी मंजुरी दिली असल्यामुळे हा ठराव व्यवस्थापन परिषदेनंतर आधिसभेनेही मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांना या पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. 

——–

अण्णाभाऊ साठे, नितीन गडकरी व शरदचंद्र पवार यांचे प्रस्ताव प्रलंबितच

यापूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांना डिलीट पदवी देण्याबाबतचा ठराव अधिसभा व व्यवस्थापन परिषदेने केला होता. या ठरावाचे काय झाले असा प्रश्न अधिसभेने उपस्थित केला होता. हे सर्व प्रस्ताव राज्यपाल कार्यालयास पाठविले होते.  परंतु त्यांच्याकडून मंजुरीने आली नसल्याचे कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी सभेत सांगितले. यांचे प्रस्ताव परत पुढील वर्षी पाठविण्याचे आश्वासन त्यांनी अधिसभेस दिले. त्यानंतरच कुलगुरूंनी शिफारस केलेल्या दोन नावांना सर्वांनुमते मंजूरी देण्यात आली.

Post Views: 98
Previous Post

श्रुतिक वरनाळे हिला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव

Next Post

शेतातील ऊस नेल्याच्या जाब विचारल्याने महिलेला कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शेतातील ऊस नेल्याच्या जाब विचारल्याने महिलेला कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1245053

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!