लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ तारखेला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण दोन पक्ष दिसणार नाही, यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विलिनीकरणाची भाषा सुरू केली आहे, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मंगळवारी ते लोकसभा प्रवासादरम्यान माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांना माहित झाल आहे की बारामती त्यांच्या हातून जाणार आहे. महाविकास आघाडीचा फुगा फुटला असून झाड-पत्त्यासारखी मोदीजींच्या वादळामध्ये आघाडी उडाली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अस्तित्व संपले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांना दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्नं पडत आहेत. काँग्रेस पक्ष देशभरात केवळ 240 जागांवरच लढतोय, मग त्यांचा पंतप्रधान कसा होणार? ते कसे देशाचं नेतृत्व करू शकतात. बहुमतासाठी, पंतप्रधान बनण्यासाठी 272 जागा निवडून याव्या लागतात. काँग्रेसने इंडी आघाडीच्या माध्यमातून भाजपाला आव्हान दिले आहे. कमी प्रभाव असलेल्या राज्यात काँग्रेसने अधिकाधिक जागा ह्या मित्रपक्षांना सोडल्या आहेत. बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांमधील 168 जागांपैकी केवळ 44 जागांवर काँग्रेस लढत आहे. दिल्ली, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही काँग्रेसने आपल्या मित्रांना अधिकाधिक जागा सोडल्या आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी असं सांगितलं आहे की भाजपा देशात २०३ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही. यावर बावनकुळे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही जरा तुमचा आकडा बघून घ्या आणि महाराष्ट्रात तुमचा सुपडा साफ होणार आहे. शरद पवार यांना माहित झाल आहे की बारामती त्यांच्या हातून जाणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा फुगा फुटलेला आहे, झाड-पत्यासारखी मोदीजींच्या वादळामध्ये महाविकास आघाडी उडाली आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड ताकद मिळत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण जे बोलत आहेत ते त्यांच्या समाधानासाठी बोलत आहेत. ते एक गोष्ट बरोबर बोले आहेत 4 तारखेनंतर या महाराष्ट्रात तुम्हाला दोन पक्ष दिसणार नाही. दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विलीनीकरणाची भाषा सुरु केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी जे म्हणतात त्याचा सरळ अर्थ आहे की या महाराष्ट्र्रात 6 पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी याना विलीन करावी लागेल यांच अस्तित्व संपणार आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यावरून वाटतं.