मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होणार असल्यामुळे या वादळाचा परिणाम म्हणून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झालं आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण पूर्व आणि बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू ते कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन पश्चिम वायव दिशेने सारखेच राखण्याची शक्यता आहे. २ डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळ निर्माण होईल आणि यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.