सांगोला – चोपडी गावांतर्गत भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उल्लेखनीय व गौरवास्पद ठरला. विद्यार्थ्यांनी लावणी, शालेयगीत, भावगीत, लोकनृत्य सादरीकरण केले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी सैनिक अमोल बाबर, दशरथ बाबर उपस्थित होते. यावेळी पहिलीसाठी दाखल पात्र मुलांना विद्यारंभ प्रमाणपत्र गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत देण्यात आले. पालकांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी सानिका जावीर, अलका बाबर, सविता चौगुले, विजया मेखले, पुनम जवंजाळ, शोभा जवंजाळ, ताई जावीर, सविता बाबर, उषा बंडगर उपस्थित होत्या.
यावेळी राहुल बाबर, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर बाबर, आगतराव चव्हाण, प्रताप बाबर, अमोल बाबर, आकाश वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देत कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उलका निकम यांनी केले. आभार अंगणवाडी सेविका मनीषा खळगे यांनी मानले.
























