सोलापूर शहरातील हद्दवाढ भागात पाण्याचे नळ नसल्याने नागनाथ नगरातील स्थानिक रहिवासीयांना पाण्याच्या टँकरची आतुरतेने वाट पाहावी लागत आहे पाच दिवसातून एकदा टँकर आल्यानंतर पाण्याचे टीप पाण्याने भरून घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सोलापूर शहरातील हद्दवाढ भागात पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. महापालिकेच्या वतीने या भागामध्ये पाच दिवसाआड दोन टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे नळ या ठिकाणी नसल्याने नागरिक पाण्याच्या टँकर भरवशी अवलंबून आहेत. त्यादिवशी टँकर तो त्या दिवशी घरातील सर्व सदस्य पाणी भरण्यात व्यस्त असतात. पिण्याच्या पाण्याचे एन उन्हाळ्यात योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. खास करून महिलांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. दरम्यान शहराच्या हद्दवाढ भागातील विमानतळ परिसरात असणाऱ्या नागनाथ नगर परिसरात हीच अवस्था पहावयास मिळत आहे.
या परिसरात पाच दिवसातून एकदा दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो साधू वास वाणी बगीचा मेडिकल पंप हाऊस या ठिकाणाहून टँकर भरले जातात आणि नागनाथ नगरकडे रवाना होतात दुपारी बारा वाजता टँकर आल्यानंतर महिलांची तसेच आबालवृद्ध नागरिकांची पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते. एका ठिकाणी सर्व पाण्याचे बॅलेर ठेवले जातात त्यानंतर पाईपच्या साह्याने त्यामध्ये पाणी भरले जाते. तसेच ज्या नागरिकांचे बॅलेर नाहीत उद्या नागरिकांना प्लास्टिकच्या घागरी मधून पाणी भरावे लागते त्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
या ठिकाणी लवकरात लवकर पाण्याचे नळी यावेत आणि पाणी घरापर्यंत यावे हीच मागणी स्थानिक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई असताना ज्या भागात नळ नाही अशा हद्दवाढ भागातील अनेक नगरांमध्ये हीच अवस्था कायम असून नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत असल्याचे विदारक दृश्य पहावयास मिळत आहे.