माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची सेतू केंद्रात गर्दी
भोकर(प्रतिनिधी)राज्यसरकारकडून २१ ते ६० वयोगटाच्या महिलांकरिता माझी लाडकी बहिण योजना सूरु केली असून पंधराशे रुपये दर महिन्याला महिलेच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने भोकर तालूक्यातील महिलांनी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी सेतू सूविधा केंद्रात व तहसिल कार्यालयात दि.१जूलै रोजी एकच गर्दी केली आहे.
महाराष्ट्रातील महायूती सरकारकडून मूख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सूरु करण्यात आली.
असून महाराष्ट्रातील रहिवाशी असणार्या महिला अडिच लाखाच्या आत उत्पन्न असणार्या महिला पात्र ठरतील तहसील कार्यालयात व सूविधा केंद्रामध्ये रहिवाशी प्रमाणपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.महाराष्ट्रातल्या महायूती सरकारने सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याची चर्चा लाभार्थ्यांमध्ये होत आहे.