सांगोला – विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून ते शाळेचे आणि संस्थेचे वैभव आहे. कष्टाळू विद्यार्थी आणि समर्पित शिक्षक यांचा उत्कर्ष माता बालक प्रतिष्ठान संस्थेला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा प्रा.नीलिमा कुलकर्णी यांनी केले. उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१२ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ.शालिनी कुलकर्णी, सचिव वसुंधरा कुलकर्णी, प्राचार्य सुनील कुलकर्णी, प्रा.राजेंद्र ठोंबरे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विश्रांती बनसोडे, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका संध्या शास्त्री, पर्यवेक्षिका सुनयना मजगे उपस्थित होत्या.
याप्रसंगी डॉ.शालिनी कुलकर्णी, प्रा.राजेंद्र ठोंबरे, प्रा. तेजस्विनी मेटकरी, प्रा.सुनील कुलकर्णी, गुणवंत विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनुजा वसमळे यांनी केले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

























