लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती असणाऱ्या माया रविकांत फाये हीची प्रसूती करते वेळी निष्काळजी हलगर्जी व बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या परिचारिका काडगाये व फटे यांची चौकशी करण्यात यावी. तथा कागदोपत्री कर्तव्यावर असल्याचे दाखविण्यात आलेले पण अनुपस्थित असलेल्या डॉ. मेश्राम यांचे मुळेच नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप रविकांत फाये यांनी केला असून त्याचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या करिता लाखनी पोलिस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे.
रविकांत मनोहर फाये यांची पत्नी माया ही गर्भवती होती. सुरुवातीपासून प्रसूतीच्या शेवटच्या आठवड्यातील दिवसापर्यंत गर्भवती व बाळाचे आरोग्य तपासणीत सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. दिवस पूर्ण झाल्यानंतर तिला १८ मे रोजी रात्री ७:३० वाजता दरम्यान प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भरती करण्यात आले. कर्तव्यावरील परिचारिका काडगाये हिने प्राथमिक तपासणी करून तिला प्रसूती गृहामध्ये प्रसूतीसाठी नेले होते. अचानक मध्य रात्री १२:३० वाजता दरम्यान परिचारिका फटे हिने गर्भवतीस जिल्हा
सामान्य रुग्णालय भंडारा येथे घेऊन जाण्याचे सांगितले. तिला कारण विचारले असता प्रसूतीला वेळ होत असल्याचे सांगितले. गर्भवतीची गंभीर अवस्था पाहता सिद्धी विनायक हॉस्पिटल लाखनी येथे भरती केले. गर्भवतीला तपासून डॉक्टरने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सिजर केले व मुलगा झाल्याचे सांगीतले.