भंडारा, २८ जून, (हिं.स) – भंडारा जिल्ह्याच्या शिवनीबांध परिसरातील साखरा फाट्यावर चारचाकी वाहनांच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची ही घटना घडली. यातील दोन जखमींना नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
अल्तमस अस्फाक खान (४२) व मोनिष इस्माईल खान (४२) दोन्ही गणेश वॉर्ड साकोली हे आपल्या चारचाकी इंडिका विस्टा गाडी क्रमांक एमएच ३६ एच २३३४ ने साकोलीहून अर्जुनी मोरगावकडे जात होते. दरम्यान, साखरा फाट्याजवळ सानगडीहून विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ओमनी क्रमांक एमएच ३१ सीआर १४०४ च्या चालकाने निष्काळजीपणाने कारला धडक दिली. यात ओमनी चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले. त्याच्या बाजूला बसलेला इसमसुद्धा जखमी झाला. मोनीष खान यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे.