पंढरपूर – समाजातील लोकांकडून समाजाची सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करीत आहे, सेवा, संस्कार,समर्पण अशा उदात्त भावनेतून केवळ लोकांचे कल्याण हाच एकमेव हेतू ध्यानात घेऊन पंढरपूर येथील भारत विकास परिषद शाखेने दिव्यांग शिबिराचे आयोजन केले आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले,
येथील काणे यांच्या डॉ गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शनिवार दि.१४फेब्रुवारी रोजी भारत विकास परिषद शाखा पंढरपूर, दिव्यांग केंद्र पुणे,महाराष्ट्र नॅचरल गॅस, लि.पुणे, कै महादेवराव आवताडे प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्या सहकार्याने दिवसभर दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्षा सौ स्मिता कोर्टीकर, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, कासेगाव येथील विजय सिंह नाना देशमुख, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, मा.दत्ताजी चितळे, दिव्यांग केंद्र पुणे चे विनय खटावकर, डॉ वर्षा काणे महावीर गांधी, आदी मान्यवर उपस्थित होते,
पुढे बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, पंढरपूर येथील या दिव्यांग शिबिराचे नियोजन गेल्या महिन्याभरापासून चालू असून सर्वांना चांगले आरोग्य मिळावे अशी भावना आहे, बदलत्या वेगवान काळात रस्ते अपघात वाढले असून रस्ते अपघातात मरण पावलेल्या लोकांची वाढती संख्या चिंताजनक आहे, गंभीर जखमी झालेले लोक हात, पाय गमावून
परावलंबी जीवन जगत असतात, चूक नसतानाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, आपल्या भारत देशात दरवर्षी पावणे दोन लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात, यात १८ते २५ वयातील युवकांची संख्या मोठी आहे, हजारो लोक जखमी होत आहेत, रा. स्व संघाच्या माध्यमातून भारत विकास परिषद समाजातील अशा दिव्यांग लोकांची सेवा करत आहे, राष्ट्र भक्कम करण्यासाठी विविध माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. असे ते म्हणाले.
आमदार समाधान आवताडे म्हणाले दिव्यांग व्यक्तीची सेवा करीत अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होत आहे, घरात एक माणूस आजारी असेल तर संपूर्ण घर आजारी पडते अपंगत्व आले की एक नैराश्य येते, पण अशा संकटावर न खचता सामर्थ्याने पुढे गेले पाहिजे,
आज अनेक दिव्यांगांना मिळणारे हात, पाय हे केवळ एक अवयव नसून एक शक्ती, वरदान आहे,
ही संस्था दिव्यांगाचा आधार म्हणून काम करत आहे त्यांनी न डगमगता प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.
प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे यांनी केले आदर्श शिकवण घेऊन सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी ही शाखा असून देशभरात भारत विकास परिषद च्या अठरा हजार शाखा व ७२हजार कुटुंबीय आहेत, नुसते शारीरिक अपंगत्व नव्हे तर मानसिक अपंगत्व जावे यासाठी भारत विकास परिषद कार्य करत आहे. असे ते म्हणाले.
दिव्यांग केंद्र पुणे चे विनय खटावकर म्हणाले, भारत विकास परिषद ची स्थापनाच दिव्यांग लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे, भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले होते तेव्हा श्रद्धेय गोळवलकर गुरुजी यांच्या सहकार्याने युद्धात पाय गमावलेल्या सैनिकांना लाकडी पाय बसवून उभे केले,दिव्यांचाची सेवा हा भारत विकास परिषद चा आत्मा आहे आपोआप फोल्ड होणारा असा हा अत्याधुनिक पाय मोफत बसवून दिला जाणार आहे, हा पाय बसवला की नॉर्मल व्यक्तीसारखे चालता येईल, हे ईश्वरी कार्य आहे सेवा करायची असेल तर योग यावा लागतो, आम्ही नाही तर तुम्हीच आमच्यावर उपकार केले आहेत असे विनय खटावकर म्हणाले,
समाजाने समाजासाठी चालवलेला हा उपक्रम असून येथून कोणीही विन्मुख परत जाणार नाही,
दत्ताजी चितळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आज पंढरपूर येथे आलो तेव्हा १९७०सालची आठवण झाली त्यावेळी विश्व हिंदू परिषदेची परिषद झाली होती गोळवलकर गुरुजी आले होते त्यांच्या भाषणातून करुणा आणि कणव दिसून येत होती,
२०१९साली जुन्या काणे हॉस्पिटल मध्ये दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा २००रुग्ण आले होते, पंढरपूर येथे पांडुरंग सर्वांची ईच्छा पूर्ण करतो, रा स्व संघाच्या प्रेरणेने भारत विकास परिषद ची स्थापना झाली आहे, सेवा व समर्पण या भूमिकेतून आपण पुढे जात आहोत. असे ते म्हणाले.
याप्रसंगी कर्मयोगी नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी व पुणे येथील स्वयंसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद वाघ यांनी केले, स्वागत अध्यक्ष सौ. स्मिता कोर्टीकर यांनी केले, आभार सचिव मंदार केसकर यांनी मानले.
युवा नेते प्रणव परिचारक, लक्ष्मण भाऊ शिरसट, आदित्य फत्तेपूरकर नगरसेविका स्मिता फत्तेपूरकर, उच्च न्यायालया सरकारी वकील ॲड सारंग आराध्ये , जिल्हा कार्यवाहक डॉ. रमेश सिद , डॉ. सचिन लादे,श्रीकांत बडवे यांनी दिव्यांग शिबिरास भेट दिली.
भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्ष सौ स्मिता कोर्टीकर, डॉ वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, सौ माधुरी जोशी, मिलिंद वाघ,,राजेंद्र केसकर, डॉ अनिल पवार, अजित कुलकर्णी, आर डी देशपांडे, अमित शिरगावकर, सौ भाग्यश्री लिहिणे, डॉ मृणाल गांधी,
सौ अनुराधा हरिदास, प्रीती वाघ, सीमा कुलकर्णी, सुरेखा कुलकर्णी,सौ रेखाकिशोरी टाक, माधुरी पवार, मंजुषा वाघ,विवेक परदेशी, सचिन पंढरपूरकर,भारत गदगे ,सतीश कोर्टिकर,दत्तात्रय तरळगट्टी, विश्वास पाटील, चैतन्य उत्पात, मनोज कुलकर्णी, सचिन बे णारे, शार्दुल नलबिलवार व काणे हॉस्पिटल स्टाफ, सर्व सदस्यांनी
शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या दिव्यांग शिबिराचा लाभ ३०८रुग्णांनी घेतला मापे घेतली असून २२मार्च रोजी त्यांना हातपाय बसविण्यात येणार आहेत.






















