Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समाजातील लोकांकडून सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करत आहे

तरुण भारतbyतरुण भारत
February 17, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – समाजातील लोकांकडून समाजाची सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करीत आहे, सेवा, संस्कार,समर्पण अशा उदात्त भावनेतून केवळ लोकांचे कल्याण हाच एकमेव हेतू ध्यानात घेऊन पंढरपूर येथील भारत विकास परिषद शाखेने दिव्यांग शिबिराचे आयोजन केले आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले,

 येथील काणे यांच्या डॉ गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शनिवार दि.१४फेब्रुवारी रोजी भारत विकास परिषद शाखा पंढरपूर, दिव्यांग केंद्र पुणे,महाराष्ट्र नॅचरल गॅस, लि.पुणे, कै महादेवराव आवताडे प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्या सहकार्याने दिवसभर दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्षा सौ स्मिता कोर्टीकर, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे  आमदार समाधान आवताडे, कासेगाव येथील विजय सिंह नाना देशमुख, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, मा.दत्ताजी चितळे, दिव्यांग केंद्र पुणे चे विनय खटावकर, डॉ वर्षा काणे  महावीर गांधी, आदी मान्यवर उपस्थित होते,

पुढे बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, पंढरपूर येथील या दिव्यांग शिबिराचे नियोजन गेल्या महिन्याभरापासून चालू असून सर्वांना चांगले आरोग्य मिळावे अशी भावना आहे, बदलत्या वेगवान काळात रस्ते अपघात वाढले असून रस्ते अपघातात मरण पावलेल्या लोकांची वाढती संख्या चिंताजनक आहे, गंभीर जखमी झालेले लोक हात, पाय गमावून 

परावलंबी जीवन जगत असतात, चूक नसतानाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, आपल्या भारत देशात दरवर्षी पावणे दोन लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात, यात १८ते २५ वयातील युवकांची संख्या मोठी आहे, हजारो लोक जखमी होत आहेत, रा. स्व संघाच्या माध्यमातून भारत विकास परिषद समाजातील अशा दिव्यांग लोकांची सेवा करत आहे, राष्ट्र भक्कम करण्यासाठी विविध माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. असे ते म्हणाले.

आमदार समाधान आवताडे म्हणाले दिव्यांग व्यक्तीची सेवा करीत अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होत आहे, घरात एक माणूस आजारी असेल तर संपूर्ण घर आजारी पडते अपंगत्व आले की एक नैराश्य येते, पण अशा संकटावर न खचता सामर्थ्याने पुढे गेले पाहिजे,

आज अनेक दिव्यांगांना मिळणारे हात, पाय हे केवळ एक अवयव नसून एक शक्ती, वरदान आहे,

ही संस्था दिव्यांगाचा आधार म्हणून काम करत आहे त्यांनी न डगमगता प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.

प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे यांनी केले आदर्श शिकवण घेऊन सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी ही शाखा असून देशभरात भारत विकास परिषद च्या अठरा हजार शाखा व ७२हजार कुटुंबीय आहेत, नुसते शारीरिक अपंगत्व नव्हे तर मानसिक अपंगत्व जावे यासाठी भारत विकास परिषद कार्य करत आहे. असे ते म्हणाले.

दिव्यांग केंद्र पुणे चे विनय खटावकर म्हणाले, भारत विकास परिषद ची स्थापनाच दिव्यांग लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे, भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले होते तेव्हा श्रद्धेय गोळवलकर गुरुजी यांच्या सहकार्याने युद्धात पाय गमावलेल्या सैनिकांना लाकडी पाय बसवून उभे केले,दिव्यांचाची सेवा हा भारत विकास परिषद चा आत्मा आहे आपोआप फोल्ड होणारा असा हा अत्याधुनिक पाय मोफत बसवून दिला जाणार आहे, हा पाय बसवला की नॉर्मल व्यक्तीसारखे चालता येईल, हे ईश्वरी कार्य आहे सेवा करायची असेल तर योग यावा लागतो, आम्ही नाही तर तुम्हीच आमच्यावर उपकार केले आहेत असे विनय खटावकर म्हणाले,

समाजाने समाजासाठी चालवलेला हा उपक्रम असून येथून कोणीही विन्मुख परत जाणार नाही,

दत्ताजी चितळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आज पंढरपूर येथे आलो तेव्हा १९७०सालची आठवण झाली त्यावेळी विश्व हिंदू परिषदेची परिषद झाली होती गोळवलकर गुरुजी आले होते त्यांच्या भाषणातून करुणा आणि कणव दिसून येत होती,

२०१९साली जुन्या काणे हॉस्पिटल मध्ये दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा २००रुग्ण आले होते, पंढरपूर येथे पांडुरंग सर्वांची ईच्छा पूर्ण करतो, रा स्व संघाच्या प्रेरणेने भारत विकास परिषद ची स्थापना झाली आहे, सेवा व समर्पण या भूमिकेतून आपण पुढे जात आहोत. असे ते म्हणाले.

याप्रसंगी कर्मयोगी नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी व पुणे येथील स्वयंसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद वाघ यांनी केले,  स्वागत अध्यक्ष सौ. स्मिता कोर्टीकर  यांनी केले, आभार सचिव मंदार केसकर यांनी मानले.

युवा नेते प्रणव परिचारक, लक्ष्मण भाऊ शिरसट,  आदित्य फत्तेपूरकर नगरसेविका स्मिता फत्तेपूरकर, उच्च न्यायालया सरकारी वकील ॲड सारंग आराध्ये , जिल्हा कार्यवाहक डॉ. रमेश सिद , डॉ. सचिन लादे,श्रीकांत बडवे यांनी दिव्यांग शिबिरास भेट दिली.

 भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्ष सौ स्मिता कोर्टीकर,  डॉ वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, सौ माधुरी जोशी, मिलिंद वाघ,,राजेंद्र केसकर, डॉ अनिल पवार, अजित कुलकर्णी, आर डी देशपांडे, अमित शिरगावकर, सौ भाग्यश्री लिहिणे, डॉ मृणाल गांधी,

सौ अनुराधा हरिदास, प्रीती वाघ, सीमा कुलकर्णी, सुरेखा कुलकर्णी,सौ रेखाकिशोरी टाक, माधुरी पवार, मंजुषा वाघ,विवेक परदेशी, सचिन पंढरपूरकर,भारत गदगे ,सतीश कोर्टिकर,दत्तात्रय तरळगट्टी, विश्वास पाटील, चैतन्य उत्पात, मनोज कुलकर्णी, सचिन बे णारे, शार्दुल नलबिलवार व काणे हॉस्पिटल स्टाफ,  सर्व सदस्यांनी 

शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न  केले. या दिव्यांग शिबिराचा लाभ ३०८रुग्णांनी घेतला मापे घेतली असून २२मार्च रोजी त्यांना हातपाय बसविण्यात येणार आहेत.

Post Views: 69
Previous Post

कवठेकर प्रशालेच्या विदयार्थ्यांच्या गीततरंगने अभ्यागत मंत्रमुग्ध

Next Post

राऊळ महाराजांचे जीवन कार्य संत महात्म्यांच्या दर्जाचे – महेश इंगळे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राऊळ महाराजांचे जीवन कार्य संत महात्म्यांच्या दर्जाचे - महेश इंगळे

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246710

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!