तभा वृत्तसेवा मुदखेड:
भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या श्रीजया अशोक चव्हाण यांचा विजय झाल्यानंतर मुदखेड शहरात भाजप कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात फटाके फोडून जलोष साजरा करण्यात आला.
भोकर मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा गड मानला जात होता पण तो गड आता भाजपने हातात घेतला आहे.
या भोकर विधानसभा निवडणुकीत खा.अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण
तर काँग्रेस कडून तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर या दोघांची अशी दुहेरी लढत होती या लढतीमध्ये भाजपच्या श्रीजया अशोक चव्हाण यांनी तिरुपती कोंडेकर यांचा पराभव करीत 49671 मतांनी विजयी झाल्या आहेत.
भोकर मतदारसंघातील मतदारांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या मुलीला भरघोस मतांनी विजयी करून त्यांना भोकर मतदारसंघाचा विकास करण्याची संधी दिली आहे.
अँड श्रीजया अशोक चव्हाण या विजयी होताच
मुदखेड शहरातील भाजप युवक कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फालकास पुष्पहार अर्पण करून विजयाचा जलोष साजरा केला.
श्रीजया चव्हाण यांच्या विजयाचा जलोष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
यांचे विश्वासू कार्यकर्ते उत्तमराव चव्हाण,रामसिंग चव्हाण, संजय आऊवार, अमोल आबादर, ऋषिकेश पारवेकर, राजू भाऊ बारतोंडे,सुशील मुंगल,रावसाहेब चौदंते, शैलेश बोडके, अभिजीत नातेवाड,शैलेश गुडमलवाड, यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.