परतुरात लोणीकरांची हॅट्रिक !
जेथलियांची बंडखोरी लोणीकरांच्या पथ्यावर
‘राहुल’ पॅटर्नने केली कमाल
परतुर: केदार शर्मा
परतूर विधानसभा मतदारसंघात आज लागलेल्या निकालात भाजपचे बबनराव लोणीकर यांनी 4740 मतांनी विजयी होऊन हॅट्रिक संपादन केली त्यांनी महाविकास आघाडीचे आसाराम बोराडे यांचा पराभव केला काँग्रेसचे बंडखोर सुरेश कुमार जेथलिया यांनी 51 हजार 709 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर वंचितचे रामप्रसाद थोरात यांनी तब्बल 29 हजार 810 मते घेतली या निवडणुकीत वर्तविलेल्या अंदाजानुसार जेथलिया यांची बंडखोरी लोणीकर यांच्या पथ्यावर पडली विसाव्या फेरीपर्यंत लोणीकर हे केवळ 42 मतांनी आघाडीवर असताना 21 व्या फेरीत उलट फेर करत हे जे बोराडे यांनी तब्बल 1340 मतांची आघाडी घेतली होती केवळ या एकमेव फेरीतच बोराडे यांची आघाडी राहिली यानंतर पुन्हा एकदा लोणीकर यांनी मुसंडी मारत 22 व्या फेरीत 292 मतांची तर 23 व्या फेरीत 1557 मतांची आघाडी घेतली तर 26 व्या फेरी अखेर पर्यंत लोणीकर यांची आघाडी 4740 मतापर्यंत वाढली व एवढ्या मतांनी ते विजय घोषित करण्यात आले
पोस्टल मतांमध्ये बोराडे यांना 928 लोणीकर यांना 570 तर जेथलिया यांना 334 मते पडली होती शेवटच्या घटकेपर्यंत बोराडे व लोणीकर यांच्यात अतिशय अटीतटीची ही निवडणूक झाली तेराव्या फेरीत जेथलिया यांनी तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली मात्र यानंतर 16 व्या फेरीनंतर पुन्हा लोणीकर व बोराडे यांच्यात काट्याची टक्कर सुरू होते मंठा तालुक्यातून लोणीकर यांनी तब्बल 383 मतांची आघाडी घेतलेली होती तर 18 व्या फेरीपर्यंत जेथलिया व लोणीकर यांच्यात तब्बल सहा हजार मतांचा फरक पडलेला होता विसाव्या फेरीपर्यंत जेथलिया हे तब्बल दहा हजार मतांनी पिछाडीवर होते तर बोराडे व लोणीकर यांच्यात केवळ 42 मतांचा फरक होता व यानंतर 21 व्या फेरीत बोराडे यांना आशादायक तेराशे चाळीस ची लीड मिळालेली असताना 22 व्या फेरीनंतर मात्र लोणीकर यांना लीड कायम राहिली या निकालाने संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यात धाकधूक होते
अखेर काय निकाल लागेल याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असताना लोणीकर यांनीच बाजी मारून तिसऱ्यांदा विजय होण्याचा इतिहास रचला निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक अधिकारी श्री पद्माकर गायकवाड व ऑब्झर्वर श्री नवीन व तहसीलदार प्रतिपा गोरे मॅडम यांच्या हस्ते लोणीकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले तदनंतर वाजा गाजा व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी बबनराव लोणीकर व विजयाचे शिल्पकार राहुल लोणीकर यांचे सत्कार करण्यात आले तर महिलांनी औक्षण घालून लोणीकरांना अभिनंदन केले संपूर्ण आकडेवारी पाहता महाविकास आघाडी उमेदवाराला सुरेशकुमार जेथलिया यांची बंडखोरी महागात पडली, तर ती लोणीकर यांच्या पथ्यावर पडली.
राहुल पॅटर्न महाआघाडीवर भारी पडले
या सर्व लढतीत राहुल लोणीकर यांनी आपल्या राहुल पॅटर्नचा उपयोग करीत एक वेगळाच आयाम स्थापित केला आहे लोणीकर यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की आगामी पाच वर्षात मी परतुर चे नाव महाराष्ट्रात नावलौकिक होईल अशा प्रकारचा विकास करणारा असून बहाद्दर कार्यकर्त्यांच्या मेहनतीने मी यशस्वी झालो असून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माता-भगिनी व नागरिकांचे मी ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले तर राहुल लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना मतदारसंघातील सर्वच मातब्बर मंडळी विरोधात गेलेली असताना केवळ निष्ठावान कार्यकर्ते व त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आपण विजयश्री खेचून आणला अशी प्रतिक्रिया दिली.
मतदान केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौरे व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्यासह पोलिसांनी चोख् पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता.