माढा : तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये भाजपचा बोलबाला झाला असून जिल्हा परिषद ४ तर पंचायत समितीच्या ७ जागेवर विजयी मिळत तालुक्यात भाजप सरस ठरले आहे. या निवडणुकीमध्ये आमदार अभिजीत पाटील यांना शिंदे वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे.
तसेच मानेगाव व मोडनिंब जिल्हा परिषद गट ही निवडणूक लक्षवेधी झाली होती. मानेगाव गटातून प्रा. शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत हे तालुक्यातील सर्वाधिक ६ हजार ८१७ मताने विजयी झाले आहेत.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुहास पाटील यांचा पराभव केला आहे. मोडनिंब जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे ह्या देखील ४हजार९०७ मताने विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावती शिंदे यांचा पराभव केले आहे. जिल्हा परिषदच्या ७ जागा पैकी भाजपला -४ राष्ट्रवादीला- २ शिवसेनेला १ तसेच पंचायत समितीच्या १४ जागा पैकी भाजपला -७ राष्ट्रवादी- ५ राष्ट्रवादी काँग्रेस (श प)-१अपक्ष-१ जागेवर उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजीत पाटील यांना शिंदे सावंत आणि साठे यांनी शह दिल्याचे दिसून येत आहे.
माढा तालुका ७ जिल्हा परिषद विजयी उमेदवार…..
मानेगाव जिल्हा परिषद गट – पृथ्वीराज सावंत (भाजप)
मोडनिंब – वंदना कांबळे (भाजप)
टेंभूर्णी – अमृता वाघे (भाजप)
उपळाई बु – माधुरी मोरे (भाजप)
कूर्डू – संभाजी ढाणे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
भोसरे – अश्विनी दळवी ( राष्ट्रवादी अजित पवार गट)
बेंबळे – सविता कोकाटे (शिवसेना शिंदे गट)
माढा तालुक्यातील १४ पंचायत समिती विजयी उमेदवार…….
मानेगाव पंचायत समिती गण – पंडित देशमुख (भाजप)
दारफळ – सोनाली साठे (अपक्ष)
भोसरी – आशिष रजपूत (राष्ट्रवादी काँग्रेस)
रोपळे क – छायादेवी कारंडे (राष्ट्रवादी काँग्रेस )
उपळाई बुद्रुक – नितीन झाडबुके (भाजपा)
भुताष्टे – स्वाती गिड्डे (भाजप पुरस्कृत)
कुर्डू – अमृता पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
अकोले खुर्द – संभाजी पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
टेंभुर्णी – प्रतिभा खरात (भाजपा)
रांझणी – सुनिता पाटील (भाजपा)
बेंबळे – पोपट अनपट (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
पिंपळनेर – बिभीषण डांगे (भाजपा)
मोडनिंब – प्राजक्ता पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
लऊळ – सोनाली माळी (भाजपा)
























