सोलापूर – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठ शिक्षक व कर्मचारीवृंद यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा सोलापुरात होत असून सहाव्या दिवशी उपांत्य फेरीचे सामने पार पडले व त्यात सकाळच्या सामन्यात नाशिकच्या MUHS संघाचा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने 2 गड्यांनी पराभव करत आणि दुपारच्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठवाडा विद्यापीठावर 21 धावांनी विजय मिळवत सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्य सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे अंतिम षटकापर्यंत सामना रंगला होता व त्यात शिवाजी विद्यापीठाने 1 चेंडू व 2 गडी राखून विजय मिळवला. कोल्हापूरच्या अनिल पाटील व नितीन प्रसाद यांनी सामनावीर पुरस्कार पटकाविला. सोमवारी सकाळी तिसऱ्या स्थानाचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक विरुद्ध डॉ.BAMU असा सामना होणार आहे.
पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर व प्र.कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्र.कुलसचिव डॉ.अतुल लकडे (विद्यापीठ क्रीडा संचालक) यांच्या नियोजनात सदर स्पर्धा पार पडत असून सहाव्या दिवशी सिंहगड इन्स्टिट्यूट चे कॅम्पस डायरेक्टर श्री.नवले सर व डॉ.अतुल लकडे, श्री. चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
1) (नाणेफेक/फलंदाजी) MUHS नाशिक : 157/7 (20)
नंदकिशोर ठाकरे 54, पुष्कर तऱ्हाळ 55 , पवन गोलवाल 17, अवांतर 10 धावा
अनिल पाटील 11/3, हरी मस्के 9/2, शशिकांत दाभाडे, राजेश्वर मुपडे प्रत्येकी 1 बळी.
पराभूत विरुद्ध
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर : 158/8 (19.5)
विक्रम कोंढावळे 50, विशाल हिळगे 43, योगेश दळवी 21, विनायक शिंदे 12 धावा
पुष्कर तऱ्हाळ 21/3, योगेश राऊत 40/3, महेंद्रनाथ चौधरी 28/2 बळी.
(नाणेफेक/फलंदाजी) सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे : 151/5 (20)
नितीन प्रसाद 70, मनीष गायकवाड 48, अवांतर 11 धावा
रवी पारधी 33/3, तनवीर सय्यद 21/2 बळी
विजयी विरुद्ध
डॉ.BAMU : सर्वबाद 130 (20)
बलभीम मारकड 24, कार्तिक चव्हाण 31, रोहित सलामपुरे 20, अवांतर 24 धावा
सचिन सुर्वे 29/3, विनोद नरके 8/2, मनीष गायकवाड बसवंत गजलवार संतोष सुगावे अक्षय वाल्मिकी प्रत्येकी 1 बळी
सोबत फोटो : पार्क मैदानावर सामनावीर पुरस्कार देताना सिंहगड कॅम्पस डायरेक्टर श्री.नवले व डॉ.अतुल लकडे, श्री.चंद्रकांत रेम्बर्सु व इतर मान्यवर
















