बुलडाणा, 22 जून (हिं.स.) : चिखली येथील प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन आमदार श्वेता महाले आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, उपवनसंरक्षक सरोज गवस, जिल्हा आरोग्य अधिकरी अमोल गीते, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत आदी उपस्थित होते.
आमदार श्वेता महाले म्हणाल्या, नागरिकांच्या सोयीसाठी तालुका प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे. ही इमारत बांधताना नागरिकांना जवळ पडेल, असे ठिकाणी निवडण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे. कोणत्याही विकासकामांना प्रशासनाची साथ असल्यास ही कामे गतीने होण्यास मदत मिळणार आहे. शासनाकडून कामाला मंजुरी आणि निधी मिळाला असताना ही कामे तातडीने सुरू करून पूर्णत्वास नेल्यास नागरिकांची सोय होणार आहे. गेल्या काळात तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने कामे सुरू व्हावीत. येत्या काळात तसलिस कार्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयाच्या इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्याचा विकास करण्यात येत आहेत. जिल्ह्यात विविध कामांना वाव आहे. गेल्या काळात पाणंद रस्त्यांची कामे करण्यात आली. येत्या काळातही विकासात्मक कामे करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांच्या सोयीसाठी संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक नक्कल स्वत: काढू शकतील. प्रशासकीय इमारतींसाठी जागेची कमतरता असली तरी यावर तोडगा काढण्यात येतील. शासनाकडून इमारती बांधण्यात येतात, येत्या काळात त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.