अक्कलकोट – दै तरुण भारतने प्रकाशित केलेली दिनदर्शिका परिपूर्ण असल्याचे गौरवोद्गार वटवृक्ष देवस्यान चे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांनी केले .
दै सोलापुर तरुण भारत ची दिनदर्शिका स्वामी चरणी ठेऊन प्रकाशन देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे वटवृक्ष देवस्थानचे पुरोहित व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे बोलत होते . दै सोलापुर तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, मराठवाडा आवृत्ती प्रमुख राजाराम मस्के देवस्थानचे पुरोहित व्यंकटेश पुजारी ज्योतिष अभ्यासक निलेश स्वामी , आदि मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी दैनिक सोलापुर तरुण भारतचे अक्कलकोट प्रतिनिधी नंदकुमार जगदाळे , पत्रकार स्वामीराव गायकवाड ‘ पत्रकार राजेश जगताप , पत्रकार रमेश भंडारी , प्रसाद सोनार , वटवृक्ष देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी श्रीशैल गंवडी ‘ पिंटू पवार , सिद्धु कुंभार मनोज जाधव आदि उपस्थित होते .


















