सोलापूर – 100 मीटर धावण्यासाठी उमेदवार जे स्पाईक शूज घालतात त्यांना त्याची परवानगी नसणार आहे, जे नॉर्मल स्पोर्ट शूज आहेत तेच उमेदवारांनी वापरावे असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले.
शहर पोलीस दलाची भरती प्रक्रिया दिनांक 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान पोलीस मुख्यालय मैदान येथे घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीच्या दरम्यान दररोज अंदाजे 1000 ते अकराशे इतके उमेदवार यांना बोलवण्यात आले आहे. ही प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणी खाली होणार असल्याची माहिती ९ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तांनी दिली.
बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी 73 कॉन्स्टेबल 6 बँड्समन या जागांसाठी दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी पर्यंत साडेतीन ते चार हजार उमेदवार चाचणी देतील. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी चाचणी ही महिलांसाठी असेल यामध्ये महिला व माजी सैनिक असे ८७८ उमेदवार चाचणी देतील. पूर्ण प्रक्रिया ही पोलीस मुख्यालयात होणार आहे. चाचणी दरम्यान कोणाला शंका असल्यास किंवा आल्यास दोन अपील कमिटी नेमण्यात आलेले आहेत. यामध्ये एसीपी मळाले हे अपील अधिकारी आहेत यांच्याकडे हाईट, चेस्ट किंवा इतर शंका असल्यास ते व्हिडिओद्वारे पारखून त्यांना संधी देण्यात येईल. जर शंकेचे निरसन न झाल्यास डीसीपी हसन हे अपील अधिकारी असतील.
उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला, आश्वासनाला बळी न पडता चाचणी पार पाडावी ही सर्व प्रक्रिया मेरिट बेसवर होणार आहे. स्पायराईट किंवा इतर पदार्थांचा सेवन करणे टाळावे असे आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन पोलीस भरतीच नव्हे तर इतर शासकीय सेवेत देखील भरती अटेंड करू शकणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
























