सोलापूर – चेष्टा मस्करीत, मोबाईल देण्या – घेण्याच्या कारणावरून वाद घालून दोघांनी मिळून हाताने चपटा मारल्या व शिवीगाळ करून मोठा दगड उचलून एकाच्या डोक्यात घालून त्याला जीवे ठार मारल्याची घटना मध्यरातली घडली.
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास राज बियर शॉपीच्या पाठीमागे समाधान नगर, अक्कलकोट रोड सोलापूर येथे श्रीकृष्ण देशमुख व मल्लिनाथ माशाळे राहणार समाधान नगर, अक्कलकोट रोड सोलापूर यांनी सायरा महबूब शेख यांचा मुलगा शेकुंबरला मेहबूब शेख याला चेष्टा मस्करीत, मोबाईल देण्या – घेण्याच्या कारणावरून वाद घालून मल्लिनाथ माशाळे याने हाताने चपटा मारल्या व श्रीकृष्ण देशमुख यांनी शेकुंबरला शिवीगाळ करून मोठा दगड उचलून शेकुंबरला च्या डोक्यात घालून त्याला जीवे ठार मारले.
यामुळे कृष्ण श्रीकृष्ण देशमुख व मल्लिनाथ माशाळे यांच्या विरोधात सायरा शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे करीत आहेत.
















