सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तसेच सोलापूर सोशल असोसिएशन्स् आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कलाचे दोन सत्रात नव्याने पुनर्रचित हिंदी अभ्यासक्रमावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे प्रो-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी सोलापूर सोशल असोसिएशन्स् आर्ट्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. इ.जा. तांबोळी होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद प्रा. डॉ. गंगाधर बिराजदार यांनी भूषविले. या सत्रात प्रा. डॉ. गिरीश काशीद यांनी विषय विश्लेषण केले. प्रा. डॉ. सुचिता गायकवाड यांनी “आधुनिक हिंदी काव्य एवं व्याकरण” या विषयावर तर प्रा. डॉ. किशोर पवार यांनी “आधुनिक हिंदी कहानी एवं व्याकरण” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दुपारनंतर झालेल्या दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. दादासाहेब खांडकर होते. या सत्रात प्रा. डॉ. देवराज मुंडे यांनी विषय विश्लेषण केले. प्रा. डॉ. सतीश घारपडे यांनी “हिंदी साहित्य एवं व्यवहारिक हिंदी तसेच प्रयोजनमूलक हिंदी” या विषयावर तर प्रा. डॉ. विठ्ठल वाघमारे यांनी “रोजगारपरक हिंदी, साक्षात्कार व पटकथा” या विषयावर सखोल विवेचन केले. समारोप समारंभास प्रा. डॉ. नवनाथ जगताप तसेच प्रा डॉ. सिद्धाराम पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समारोपाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ.अनिल साळूंके यांनी भूषविले. या कार्यशाळेमुळे प्रथम कलाच्या नव्या हिंदी अभ्यासक्रमाची सखोल माहिती प्राध्यापकांना मिळाली असून अध्यापन प्रक्रियेला निश्चितच दिशा मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यशाळेला विविध महाविद्यालयांतील हिंदी विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगिता यादव तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. रईसा मिर्झा यांनी केले.
Read moreकरकंब : एडूहील फाउंडेशन(इएचएफ)नवी दिल्ली यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या गणित,विज्ञान व इंग्रजी विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये एसपी.स्कूल नांदोरे तालुका पंढरपूरच्या...
Read moreसोलापूर - पित्याच्या स्मृती जतन करणे हे केवळ कौटुंबिक कर्तव्य नसून, तो एक सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्याचा उदात्त प्रयत्न आहे....
Read moreकरकंब : बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखा ही पंढरपूर आणि परिक्षेत्रातील गावांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते.चालू आर्थिक वर्षात शासनाच्या विविध...
Read moreअक्कलकोट - नगराध्यक्ष पदाची सूत्रे भारतीय जनता पार्टीचे युवा नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी स्वीकारली आहेत. तसेच उपनगराध्यक्ष पदी ऋतुराज राठोड...
Read moreकुर्डूवाडी - महापालिका निवडणूकीच्या निकालानंतर संपुर्ण राज्यात अस्तीत्वासाठी धडपडणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्टृवादी काँग्रेसला माढा तालुक्यातील कुर्डू आणी भोसरे...
Read moreवैराग - बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे एकता महिला मंच यांच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून 'मी विधवा नव्हे, मी स्त्री' हा...
Read moreवैराग - कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपल्यास एखाद्याचे प्राण कसे वाचवता येतात, याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे येथे आला...
Read moreपुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही...
Read moreपंढरपूर – येथील चंद्रभागा नदीचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी चंद्रभागा नदीच्या प्रदूषणा संदर्भात दाखल असलेल्या उच्च न्यायालयातील याचिकांच्या सुनावणीच्या वेळी...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697