वेळापूर – येथील लोकविकास शिक्षण प्रसारक संस्था संचलित लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल, लोकविकास मराठी मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अमोल पांढरे, मुख्याध्यापक सुनिल पताळे, अजित बनकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
प्रशालेतील विद्यार्थी अहिल्या लवटे, मृणाल पिसे, आरोही सावंत, शुभश्री बनकर, स्वराज शिंदे, विरांश कुदळे, फैजान मुरसल, श्रेयस शेंडगे, रसिक साठे, पूजा जगताप, ऐमन तांबोळी , राजश्री भोसले व शिक्षक विद्या येवारे व राणी शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री साठे यांनी केले व आभार प्रदर्शन वैशाली पांढरे यांनी केले.























