चंद्रपूर 2 जुलै (हिं.स.) – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत अर्ज भरतांना काही समस्या असल्यास जिल्हा स्तरावर सुविधा केंद्र स्थापन केले आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 7972059274 तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करता येईल असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
अर्जासाठी लागणारे उत्पन्न दाखले तसेच रहिवासी प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी विविध पातळीवर नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका अधिकारी, तहसीलदार यांनी कॅम्प आयोजित करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्याचे महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.