▪️ इंग्रजी गाणी/ कविता : मुलांना इंग्रजी गाणी आणि कविता ऐकवून भाषेची आवड निर्माण करा. रंगीत पुस्तके आणि ॲनिमेशन वापरून त्यांना आकर्षित करा.
▪️ इंग्रजीत बोला : घरात मुलांशी इंग्रजीत बोला. त्यांना सोप्या वाक्यात बोलायला शिकवा. त्यांना स्वतःला व्यक्त करण्यास आणि इतरांना समजून घेण्यास प्रोत्साहित करा.
▪️ इंग्रजी पुस्तके : मुलांना इंग्रजी पुस्तके आणि मासिके वाचण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांना आवडणारी पुस्तके निवडू द्या. त्यांना कथेबद्दल बोलण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करा.
▪️ इंग्रजी भाषेचे ॲप : मुलांना इंग्रजी भाषेतील ॲप्स वापरू द्या. या ॲप्समध्ये मुलांना भाषा शिकण्यास मदत करणारे विविध खेळ आणि ऍक्टिविटी आहेत.