भोकरदन : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024″या योजनेचे अर्ज भरण्यासाठी भोकरदन नगर परिषदच्या वतीने शहरातील प्रत्येक वॉर्डात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात ही केली आहे.
राज्यातील महायुतीच्या सरकारने नुकतेच विधानसभा अधिवेशनात”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024″या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना अत्यंत प्रभावशाली राहण्याच्या दृष्टीने सरकारने तात्काळ लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले व 31 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक पात्र महिलेने अर्ज दाखल करावा. यासाठी दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत, दरवर्षी शासन 46 000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जुलै 2024 पासून म्हणजे तात्काळ केली जाणार आहे.
यासाठी पात्रता म्हणून-वय 21 ते 60 वर्षे, महाराष्ट्र राज्याची रहिवासी, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला, लाभार्थ्यां कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे किंवा राशन कार्ड तसेच बँक खाते आवश्यक आहे.
सदरील योजना जाहीर झाल्यानंतर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसील व सेतू सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली परिणामी दलालांनी या संधीचा फायदा घेऊन या लाभार्थ्यांना लुटण्याच्या तक्रारी ही मोठया प्रमाणात वाढल्या होत्या. विशेष म्हणजे काही जण ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी मोठी आर्थिक लूट करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविका तसेच इतर कर्मचारी तर शहरी भागात नगर परिषद प्रशासनाला कामाला लावले.
दरम्यान, भोकरदन नगर परिषद ने तात्काळ प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान प्रत्येक वॉर्डात अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत ते खालीलप्रमाणे:
वॉर्ड क्र.1 मध्ये पंजाब जाधव व संतोष राठोड
वॉर्ड क्र.2 मध्ये गणेश बैरागी व रईस कादरी
वॉर्ड क्र.3 मध्ये मनिषा नरवडे व वैभव पुणेकर
वॉर्ड क्र.4 मध्ये बजरंग घुलेकर व भूषण पळसपगार
वॉर्ड क्र.5 मध्ये दीपक सिंगल व कैलास जाधव
वॉर्ड क्र.6 मध्ये अक्षय पगारे व चौतराम सरकटे
वॉर्ड क्र.7 मध्ये सोमीनाथ बिरारे व अमित गुंटूक
वॉर्ड क्र.8 नोडल अधिकारी अजय व्यवहारे,कर्मचारी अंबादास इंगळे,गोवर्धन सोनवणे, संद्या मापारी,शेख अजीम, समी बेग आदी.



















