बेलोरा ते जानेफळ रोडवरील कुटुंबरेवाडी रस्त्याची दुरवस्था….
लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची मागणी
जाफ्राबाद प्रतिनिधी :-
जाफराबाद तालुक्यातील बेलोरा ते जानेफळ रोड येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कुटुंबरेवाडी रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले होते परंतु आता या रस्त्याची अत्यंत दूर्दशा झाली आहे या रस्त्याने पादचाऱ्यांना ग्रामस्थाना व शाळकरी मुलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्याचे दुरवस्था पाहून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर काही दिवसापूर्वी मुरूम टाकल्याने जागोजागी चिखलसाचला असून खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा आहे समजेना झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करावे अशी मागणी समस्त गावकऱ्या कडून होत आहे.
.
विधानसभेपूर्वी या रस्त्याचे काम न झाल्यास संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे तरी लोकप्रतिनिधींना विनंती की या रस्त्याकडे लक्ष द्यावे
गोपाल कुटुंबरे ग्रामस्थ बोरगाव वाडी