सुरेश कुटे यांच्या सर्व प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे द्या-आ.राजेश टोपे
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड 29 जुलै राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रिडिट सोसायटी लि,बीड यांच्या राज्यात जवळपास 100 च्या वर शाखा असून हजारो कोटीच्या दरम्यान ठेवी आहेत.सोसायटीने आकर्षक व्याजदर दिल्यामुळे गोरगरीब लोकांनी काबाड कष्ट करून रोजंदारी करून पन्नास हजार,एक लाख रुपये अशा खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवल्या आहेत.
मोठ्या धनिकांच्या एक ते दोन कोटीच्या ठेवी आहेत.या सर्व लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. ठेवीदारांचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले असून त्यांना मुला-मुलींच्या शिक्षणासाठी,लग्नासाठी पैसे नाहीत.ठेवीदारांनी ऑक्टोबर ते जून आठ-नऊ महिन्यापासून धरणे आंदोलन,रस्ता रोको आंदोलन,उपोषण केले असून कुटे यांच्यावर 25 केसेस दाखल झालेल्या आसून अद्याप प्रश्न सुटलेला नाही.क्रेडिट सोसायटीच्या सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे वापस काढायचे आहेत ते मिळत नाहीत.
आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर राहिली नाही अशी मानसिकता ठेवीदारांची तयार झालेली आहे. त्यामुळे अशा घटना घडण्याच्या अगोदर आता खूप म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेले या दृष्टिकोनातून ताबडतोबिने शासनाने सुरेश कुटे यांच्या सर्व प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देणेबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहात प्रश्न उपस्थित केला.