श्री बाळासाहेब दत्तात्रेय दखणे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे 29 जुलै आंतरवाली सराटी येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष श्री बाळासाहेब दखणे* यांना नामांकित ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम इंडिया या संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठेचा महात्मा ज्योतिबा फुले आंतरराष्ट्रीय पुरस्कार 17 जून रोजी नवी दिल्ली येथे माननीय नरेंद्र पासवान जी नेपाळ महानंदा शंकर दत्ता आसाम जी प्रताप कर्नाटका या मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सामाजिक कार्यासाठी दिल्या जाणारा हा पुरस्कार भारतातून फक्त श्री बाळासाहेब दखणे यांनाच मिळाला आहे या पुरस्काराबद्दल नेपाळच्या प्रसिद्ध नर्तिका शितल सिंगजी शर्मा पटवा फिल्म प्रोडक्शन नेपाळच्या सरिताजी पटवा डॉक्टर भारती मॅडम राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक
श्री बबनरावजी तायवडे* सर मराठवाडा अध्यक्ष दीपक जी जाधव सर व सर्व पदाधिकारी तसेच
अखिल भारतीय लाड समाज यांनी अभिनंदन केले आहे