परतुर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये मंगळवार दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला स्कूलचे अध्यक्ष अभय कुमार काळुंके यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच यावेळी स्कूलचे शिक्षक श्याम चव्हाण यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे विद्यार्थी व उपस्थित असणाऱ्या शिक्षकांकडून सामुहिक वाचन करून घेतले.
यावेळी यावेळी छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल स्कूलच्या सचिव मीनाक्षी काळुंके तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका लंका भवर, उपमुख्याध्यापक अरुण चंदने, ज्योती खैरे,शिक्षक वृंदांमध्ये पुरुषोत्तम मगर, शेषनारायण बिल्लारे , नागेश्वर क्षीरसागर, सुरज पहाडे, अखिलेश कुमार, मीना मसलेकर , महानंदा व्यवहारे, अश्विनी यंदे, साधना पाईकराव, दुर्गा भोसले, मंजुषा बोंडे, आधी शिक्षक उपस्थित होते. तसेच स्कूल मधील चिमुकले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.