अकलूज – मराठी नववर्षाच्या निमित्ताने आज अकलूज बाजारपेठेमध्ये साखरेचे हार फुलांचे हार घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीस आले होते.
साखरगाठी हाराला आणि खोबरे खारीकराला यावेळेस महत्त्व असते प्रत्येक घरी साखरेचा हार घेऊन जातात पूर्वी साखरेचे हार घरोघरी वाटण्याची पद्धत होती आता ती मोडकळीस आली आहे अकलूज मध्ये साखरगाठी हार तयार करण्याचे चार-कारखाने होते मात्र आता सर्व कारखाने मजुरा भावी बंद असून बाहेरून पंढरपूर नातेपुते करमाळा आदी भागातून हारगाठी व्यापारी आणून विकत आहेत साधारण 80 ते शंभर रुपये किलो हार गाठी विकली जात आहे खोबरे वाटी व खारीक यांचे हार पाहायला सुद्धा मिळाले नाहीत.
अकलूज हे पंचक्रोशीतील मोठे गाव आहे परंतु आता खेडोपाडी मोठी मोठी दुकाने झाली आहेत तिथे हार गाठी व इतर सर्वच साहित्य मिळत असल्याने ग्राहक अकलूज कडे मोठ्या प्रमाणावर येत नाही बाजारपेठ मोठी असल्याने परिसरातील फुल विक्रेते विशेषतः पंढरपूर वरून फुल माळा विक्रीसाठी येतात 50 ते 200 रुपयापर्यंत फुलांचे हारांचे भाव होते पिवळा झेंडू मोठ्या प्रमाणा त आज विक्रीसाठी आला होता त्याचबरोबर पांढरी बिजली आणि शेवंती फुले सुद्धा बाजारात विक्रीसाठी आली होती.
गुरुलिंग तांदूळकर यांचा साठ वर्षापासून हार गाठी बनवण्याचा कारखाना होता त्याच्यानंतर त्यांचे नातू हा व्यवसाय करू शकले नाहीत त्यांनी सांगितले या कामासाठी मजूर मिळत नाही आणि पूर्वीसारखे साखरेच्या हार विक्री सुद्धा होत नाही जिथे गिऱ्हाईक पाच किलो दहा किलो घेऊन जात होता तेथे एक आणि अर्ध्या किलोवर ग्राहक आला आहे

























