भोकर येथील विमल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी
भोकर(प्रतिनिधी) येथील विमल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने रेल्वेच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकाम केले असून ते पाडण्यात यावे असे तक्रारी निवेदन स्वप्निल केशवराव गाडे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले की भोकर येथील जुना गट क्रमांक ३मालमत्ता क्रमांक ३००७नवीन वार्ड क्रमांक२ मालमत्ता क्रमांक ३१९६ वर विमल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या शाळेकरिता भव्य दिव्य अशा इमारतीचे बांधकाम करण्यात आले सदर बांधकाम रेल्वे हद्दीत करण्यात आले असून रेल्वे विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही,
भोकर नगर परिषदेने सुद्धा ह्या कुठल्या बाबीचा विचार न करता बांधकाम परवानगी देऊन टाकली प्रत्यक्ष जाऊन जागेची पाहणी केली नाही.
रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार रेल्वे हद्दीच्या ३०मीटरच्या आत बांधकाम करता येत नाही विमल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल चालकांनी रेल्वे विभागाकडून कुठलेच ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही सदर बांधकाम करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही शाळेपासून जवळच रेल्वे पटरी आहे सर्व नियम बाजूला सारण्यात आले आहेत,
जिल्हाधिकारी नांदेड व रेल्वे विभाग नांदेड यांना तक्रारी अर्ज करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी वेळेवर होऊन कारवाई न झाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर आपण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही निवेदनात स्वप्नील गाडे यांनी दिला आहे निवेदनाच्या प्रति संबंधितांना देण्यात आल्या आहेत.