पिलीव – माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी इरकरवस्ती याठिकाणी जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेचे पहीली ते चौथी असे चार वर्ग आहेत.परंतु याठिकाणी सध्या फक्त एकच शिक्षक कार्यरत असल्यामुळे याठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.याठिकाणी काही दिवस तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या शिक्षकांचा पदभार दुसरीकडे देण्यात आला .
यामुळे सध्या एकच शिक्षक कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे त्यामुळे याठिकाणी ताबडतोब शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे विक्रम सुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्य परिषद सोलापुर, गटशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्ह्य परिषद सोलापूर, गटशिक्षणाधिकारी माळशिरस पंचायत समीती माळशिरस, गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समीती यांच्याकडे केली .असुन ताबडतोब याठिकाणी शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा पालकांना शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शासनाने ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया मे महिन्यातच राबविणे आवश्यक होते माञ ही बदली प्रक्रीया सप्टेंबर _ आकटोंबर मध्ये राबविण्यात आल्यामुळे अनेक शाळेत शिक्षकाच्या जागा रिक्त राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकामधुन विचारला जात आहे. फोटो _ विक्रम सुळे.


















