आयपीएल २०२४ साठीचा लिलाव नुकताच दुबईत संपन्न झाला. त्यात अनेक अनकॅप्ड खेळाडूंचं नशीब पालटलं. त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली.
आयपीएल २०२४साठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक अनकॅप्ड खेळाडूंचं नशीब पालटलं. २० लाखांची बेस प्राईज असलेले युवा खेळाडू मिनिटांमध्ये कोट्याधीश झाले. या यादीत झारखंडचा आदिवासी खेळाडू रॉबिन मिंझचादेखील समावेश आहे. २०२१ मध्ये आयपीएल जिंकलेल्या गुजरात टायटन्सनं त्याला ३.६ कोटी रुपयांना खरेदी केलं. आता त्याच्या वडिलांनी धोनीनं लिलावापूर्वी दिलेल्या वचनाबद्दल सांगितलं. त्यावेळी रॉबिनचे वडील भावुक झाले होते.
आयपीएल लिलावात रॉबिनसाठी ३.६ कोटी रुपयांची बोली लागली. गुजरात टायटन्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. ही बातमी रॉबिनचे वडील फ्रान्सिस झेवियर मिंझ यांना सीआयएसएफच्या एका जवानाकडून समजली. तो क्षण आजही रॉबिन यांच्या लक्षात आहे. ‘लिलावाच्या दिवशी सीआयएसएफचा एक जवान माझ्याकडे आला. त्यानं मला मिठी मारली. अहो फ्रान्सिस सर तुम्ही करोडपती झालात, असं तो जवान मला म्हणाला,’ अशी आठवण फ्रान्सिस यांनी सांगितली.
रॉबिनचे वडील ४८ वर्षांचे निवृत्त लष्करी जवान फ्रान्सिस झेवियर मिंझ रांचीतील विमानतळावर एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. प्रवाशांना बोर्डिंग पाससाठी मदत करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ‘काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनीची भेट झाली होती. विमानतळावर धोनी भेटला होता. लिलावात तुमच्या मुलाला कोणीच संघात घेतलं नाही, तर आम्ही नक्की घेऊ. तुम्ही काळजी करू नका, असं धोनी त्यावेळी मला म्हणाला होता,’ असं फ्रान्सिस यांनी सांगितलं.
रॉबिन मिंझसाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये लिलावात चुरस पाहायला मिळाली. अखेर गुजरातनं ३ कोटी ६० लाखांची बोली लावत बाजी मारली. रॉबिन मिंझचं कुटुंब तेलगावातलं आहे. झारखंडच्या गुमला जिल्ह्यातल्या आदिवासीबहुल भागात फ्रान्सिस यांचं कुटुंब राहतं. फ्रान्सिस ऍथलेटिक्समध्ये होते. क्रीडा क्षेत्रात सक्रिय असल्यानं त्यांना लष्करात नोकरी मिळाली. ते लष्करात असतानाच त्यांचं कुटुंब रांचीला गेलं. तिथे रॉबिननं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. रॉबिन धोनीला त्याचा आदर्श मानतो.