नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना आ. हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाखाचा धनादेश वाटप
नवीन नांदेड प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदारसंघातील नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना नांदेड दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाख रुपयांचे लोहा तहसिल कार्यालयात धनादेश वाटप करण्यात आले.
नुकतेच काही दिवसांपूर्वी लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदारसंघातील शेवडी बा.येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला यात वादळी वाऱ्यासह पावसापासून बचाव करण्यासाठी शेवडी बा. येथील शेतकरी शिवाजी विठ्ठल मुडेवाड ट्रॅक्टरच्या टाॅलीच्या आडोशाला थांबले असता ट्रॅक्टरची टॅली उलटुन शेतकरी शिवाजी विठ्ठल मुडेवाड यांचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या एका घटनेत शिवणी जामगा येथील महिला सुनंदा श्रीराम जामगे या शेतात काम करीत असताना जोरदार विजेच्या कडकडाटासहित पाऊस पडत असताना अचानक आकाशातून वीज सुनंदा श्रीराम जामगे यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
तेव्हा या दोन्ही कुटुंबीयांच्या वारसांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी म्हणून नांदेड दक्षीण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मयताच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले.
व त्यांचे धनादेश लोहा तहसिल कार्यालयात कै. शिवाजी विठ्ठल मुडेवाड यांच्या पत्नी रुक्मिणबाई शिवाजी मुडेवाड रा. शेवडी बा. व कै. सुनंदा श्रीराम जामगे यांचे पती श्रीराम व्यकंटी जामगे यांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश वाटप केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे लोहा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पाटील पवार, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दता पाटील दिघे,नायब तहसीलदार अशोक मोकले ,नायब तहसीलदार राजेश पाठक, मंडळ अधिकारी कटारे, तलाठी भुमेश्वर विभुते, जामगा शिवणीचे सरपंच तुकाराम पाटील जामगे आदी उपस्थित होते.