सांगोला, तालुका प्रतिनिधी : अत्याधुनिक उपचारासाठी उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम होऊन वर्षे झाले तरीही अद्याप ड्रामा केअर सेंटर सुरू झाले नाही. दहा कोटी रुपयांचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी 3 कोटी 60 लाख रुपयांचे सुरू असणारे आतील फर्निचर, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन लाईन यांचे कामकाज अद्यापही सुरू आहे. पदभरतीनंतरच हे सेंटर सुरू होईल.
रस्त्यांचे जाळे सर्वत्र वाढले असून होणारी अपघातांची संख्या ही वाढली आहे. त्या दृष्टीने योग्य व वेळेवर उपचार हवा यासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे दहा कोटी रुपयांचे बांधकाम पूर्ण होवून वर्ष झाले आहे. आतील फर्निचर व इतर कामासाठी 3 कोटी 69 लाख रुपयांचे कामकाज सुरू आहे.
त्यातील साधनसामुग्री, ऑक्सिजन लाईन, ऑपरेशन थिएटर इत्यादी थोडेफार अपूर्ण काम अद्यापही सुरूच आहे. सध्या या ड्रामा केअर सेंटरसाठी पद निश्चिती करण्यात आली असून पदभरती नंतरच हे सेंटर सुरू होईल असे सध्याचे चित्र दिसून येत आहे. कुठे उद्या रुपये खर्चून काम होऊ नये थोड्याशा अपूर्ण कामासाठी हे सेंटर सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असले तरी लवकरच याचे काम पूर्ण करून वैद्यकीय सेवेसाठी हे सुरू करावे अशी जनसामान्यांमधून मागणी होत आहे.