जाफराबाद /मुकेश भारद्वाज
जाफराबाद गर्भवती मातांनी सुदृढ बालकास जन्म द्यावा आणि आईचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेअंतर्गत पहिल्या बाळाच्या जन्मावेळी पाच हजार रुपये, तर दुसऱ्या बाळाच्या जन्मावेळी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र, ज्या पोर्टलवर गर्भवती मातांच्या नावाची नोंद केली जाते ते पोर्टल अपडेट नसल्याने मागील दोन ,तीन वर्षापासून मातांची प्रसूती होऊनदेखील या योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.
पूर्वी शासनामार्फत खासगी व्यक्तींकडून गर्भवती मातांच्या नावांची नोंद केली जात होती; परंतु मागील वर्षभरापासून आरोग्य विभागाकडे हे काम देण्यात आले आहे. यातच पोर्टलचा खोळंबा झाल्याने मागील काळापासून कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थी मातेना योजनेचा लाभ मिळाला नाही.
योजना मस्त काम शुन्य
आशा कार्यकर्ता यांना वारंवार कागदपत्रे देऊन सुद्धा योजनेपासून वंचित या विषयी आरोग्य कार्यालयास भेट दिली असता तेथे आरोग्य अधिकाऱ्यांची भेट होत नाही व फोन लावला असता फोन सुद्धा उचल नाही इतर कर्मचाऱ्यांना कडून योग्य उत्तर मिळत नाही.
काय आहे योजना?
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१७ पासून ही योजना सुरू केली. गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पहिल्यांदा ५ आणि दुसऱ्यावेळी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.ही माहिती सुद्धा संबंधित कर्मचाऱ्याला देता येत नाही