जिंतूर जालना मार्गावर चारठाणा पुलावर संभाजीनगर कडून नांदेड कडे रुईच्या गाठी घेऊन जाणारा ट्रकच्या चालकास रस्त्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने ट्रक क्रमांक ए पी ०५ टीबी २८८९ या ट्रकचे पाटेतुटल्याने तुटल्याने ट्रक पुलाच्या मधोमध अडकला ज्यामुळे जालन्याकडच्या बाजूने एक किलोमीटरच्या पुढे तर जिंतूर च्या बाजूने एक किलोमीटरच्या पुढे वाहनांची लाईन लागलेली पाहायला मिळते सदर ट्रक रात्री दोन वाजल्यापासून अडकून पडला असून
त्यामुळे गेली सहा तासापासून जिंतूर ते जालना संभाजीनगर कडे जाणाऱ्या संपूर्ण वाहनांना अडथळा निर्माण झाला असला तरी अद्याप रस्ता मोकळा झालेला नाही सदर रस्त्याचे काम पिंपरी ते जिंतूर काम रखडले असून गेली सहा महिन्यापासून 300 ते 400 वर्षांपूर्वीची झाडे रोडच्या कामाचे निमित्त पुढे करून वृक्षवल तोडली गेली आहेत तरी अद्याप वाहनधारकांना चांगला रस्ता नसल्यामुळे जादा इंधन वेळ या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे सहा महिन्यापूर्वी अपघातानंतर याच पुलावरील खड्डे वसमत तालुक्यातील दोन युवकांचा जीव गेल्यानंतर चारठाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) श्री बालाजी गायकवाड यांनी संबंधित रोडचे कॉन्ट्रॅक्टर श्री आर बी घोडके यांना कळवून त्यांच्याकडून ते खड्डे बुजून घेतले होते
परंतु सध्या पावसाळा सुरू असून वाहनांचे रेल चाल वर्दळ भयानक आहे त्यामुळे सतत खड्डे पडत असून छोट्या वाहनावरील ताबा सुटून अनेक वेळा एक्सीडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु अवैध धंद्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्ना पुढे अशा अपघातग्रस्त गोष्टीकडे संबंधित सध्याचे पोलीस उपनिरीक्षक कापुरे यांना प्रशासनाला कळवण्यात वेळ मिळत नसून चोरट्या मार्गाने रेती विक्री रात्रीच्या वेळी चारठाणा येथे सुरू असून मटका जुगार आदी अवैध धंदे बोकाळले आहेत मिळालेल्या माहितीनुसार रेती मधून चारठाणा पोलीस स्टेशनला 65000 बामणी पोलीस स्टेशन 65000 व जिंतूर पोलीस स्टेशन 65000 यासह उपविभागीय पोलीस अधिकारी यांना वेगळा तर तहसीलदार जिंतूर व सेलू यांच्यासह इतरांना देखील हप्ते द्यावे लागतात
असे नाव न सांगण्याचा अटीवर माहिती मिळाली तरी याबाबत जिल्हा प्रशासनाने चारठाणा पोलीस स्टेशन एकंदरीत कर्तबगारी कडे लक्ष देण्याची गरज असून चारठाणकरांनासहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) बालाजी गायकवाड यांची बदली झाल्यापासून गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असेच म्हणावे लागते कारण कधीही अद्याप पर्यंत वाहन चालकांची लायसन्स गाडीचे पेपर बाबतीत चौकशी झालेली नसून ट्रॅक्टर चालकांकडे लायसन्स व कागदपत्रे नसल्याचे समजते तरीसुद्धा सदरचे ट्रॅक्टर मेन रोड ने वाहतूक करताना दिसतात तरी याबाबत लवकरच वैयक्तिकरित्या संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचे बोलून दाखवली जाते
तसेच चारठाणा टी पॉइंटवर जिंतूर ते संभाजीनगर कडे जाणाऱ्या नांदेड विभागासह परभणी विभागाच्या संपूर्ण गाड्यांना चारठाणा फाट्यावर थांबा दिलेला असल्याने या ठिकाणी दिवसभर प्रवाशांचे वर्दळ असते परंतु त्या ठिकाणी देखील अवैध वाहतूक करणारी वाहने मोटरसायकल आदी वाहने रस्त्यात उभी करून महामंडळाच्या बसेस ना प्रवासी चढ-उतार करण्यास व प्रवाशांना प्रवास करण्यास अडचण निर्माण करतात या ठिकाणी अनेक वेळा संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोळ्याने बघून देखील कोणालाही वाहन बाजूस घेण्यास सांगत नाहीत तसेच मंठा बाजार शुक्रवार या दिवशी जनावराचा छोटासा बाजार देखील रस्त्यावरच भरला की काय असे दिसते यामुळे अनेक अपघातांना आमंत्रण दिले जाऊ शकते या सर्व बाबीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याने नागरिकांत बोलले जाते आहे