सोलापूर महापालिका प्रशासनातील २२६ पद भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरिता दिनांक २० डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, यातील फायरमन पदाच्या ५ टक्के प्रमाणे होमगार्डना समांतर आरक्षण लागू करण्यात आले असल्याचे आदेश महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढले आहेत.अनेकवर्षांनंतर अखेर सोलापूर महापालिकेत भरती करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वर्ग १ ते ४ मधील एकूण २२६ पदांचा समावेश आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी २२६ पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.सोलापूर महानगरपालिकेच्या २२६ पदभरती अर्ज सादर करण्याकरीता दि.१० ते ३० नोव्हेंबर २०२३ अखेर पर्यंत कालावधी देण्यात आलेला होता. या कालावधीमध्ये वाढ करण्यात येत असून उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर२०२३ (रात्री ११.५५ वा) असा करण्यात आला आहे.याशिवाय जाहीरातीमधील पद क्र.२५ मधील फायरमन पदासाठी नगर विकास विभागाचे क्र.अशसेके-१००६/५६/प्र.क्र. २४/०६/नवि-२४, दि.०५ फेब्रुवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार होमगार्डमध्ये कमीत कमी ३ वर्षे सेवा झालेल्या व फायरमन पदासाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या व विहित वयोमर्यादेतील व विहित पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांकरीता एकूण भरण्यात येणाऱ्या फायरमन पदाच्या ५ टक्के प्रमाणे समांतर आरक्षण होमगार्ड यांना लागू करण्यात आलेले आहे. फायरमन पदासाठी होमगार्ड पदाचे समांतर आरक्षण दर्शविणारा तक्ता मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे,असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी आज काढलेल्या अर्ज सादर कालावधी मुदत वाढ व शुद्धिपत्रकात म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...