कोल्हापुरात भरधाव कारने चौघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील सायबर चौकात हा भीषण अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळतेय.
सायबर चौकात एक भरधाव कार आली आणि तिने समोरच्या टू व्हीलर गाड्यांना धडक दिली. त्यापैकी टू व्हीलरवरील दोन-तीन जण तर हवेत उडाले. तर, ही कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.