करकंब : केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत इयत्ता ८वीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (एनएमएमएस) जि.प.प्रा.शाळा जळोलीच्या इयत्ता ८वीच्या ७ विद्यार्थिनींनी आदर्श शिक्षक नागनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश संपादन करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली.
यामध्ये समृध्दी नरसाळे,पूजा पवार,साक्षी लांडे,सायली शिंदे(सारथी शिष्यवृत्ती धारक)अनुजा कोळेकर, दिव्या नवगिरे,ज्ञानेश्वरी नवगिरे या विद्यार्थ्यांनीनी हे घवघवीत यश संपादन केले.या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत नरसाळे यांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षक गायकवाड व यशस्वी विद्यार्थीनींनींचा सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक जयवंत कापसे,शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे,नागनाथ गायकवाड,सिध्देश्वर लोंढे,कैलास नरसाळे,बाळासाहेब खांडेकर,शिक्षिका देवकी कलढोणे (दुधाणे),शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत नरसाळे,उपाध्यक्ष साधना किर्ते,पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

























